शाहरुख खान त्याच्या ‘पठाण’मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. चित्रपटाची चांगलीच हवा निर्माण करण्यात शाहरुखला चांगलंच यश मिळालं आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर दुबईच्या बुर्ज खलिफावर प्रदर्शित करण्यात आला. साऱ्या जगभरात शाहरुखचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पहात आहेत. या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग परदेशात सुरू झाले आहे. अशातच त्याने आपल्या कुटुंबासाठी विशेष स्क्रीनिंगचे आयोजन केले होते.
शाहरूख खान नेहमीच आपल्या कुटुंबियांना प्राध्यान देत असतो. आपल्या मुलांच्या बाबतीत एक जागरूक पालक म्हणून तो ओळखला जातो. पठाणचे प्रदर्शन दिवसांवर ठेपले आहे. त्याआधी शाहरुखने मुंबईत पठाणचे विशेष स्क्रीनिंग ठेवले होते. ज्याला त्याची पत्नी गौरी खान, मुलं सुहाना आणि आर्यन उपस्थित होते. गौरीची आई सविता छिबर आणि शाहरुखची बहीण शहनाज खानही पठाणच्या स्क्रीनिंगमध्ये दिसल्या. चित्रपट संपल्यानंतर त्यांचे चेहरे प्रसन्न होते.
“गुटखा विकणारे स्टार्स आदर्श…” ‘गांधी गोडसे’ चित्रपटाच्या दिग्दर्शकांची संतप्त प्रतिक्रिया
‘पठाण’ प्रदर्शित व्हायला अजून ९ दिवस बाकी आहेत. पण त्याआधीच ‘पठाण’चा दबदबा सर्वत्र दिसून येत आहे. रिपोर्टनुसार, यूएईमध्ये या चित्रपटाची आतापर्यंत ६५ हजार डॉलर्सची ४५०० तिकिटे विकली गेली आहेत. तर त्याचप्रमाणे अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातही ‘पठाण’ पाहण्यासाठी लोक प्रचंड उत्सुकता दाखवत आहेत. अमेरिकेत या चित्रपटाची आतापर्यंत ३.५ लाख डॉलरची २२ हजार ५०० तिकिटे विकली गेली आहेत. तर ऑस्ट्रेलियात ‘पठाण’च्या पहिल्या दिवशीच्या शोजसाठी ६५ हजार ऑस्ट्रेलियन डॉलर किमतीची ३ हजारहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत.
या चित्रपटात शाहरुखबरोबर दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहम महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. शिवाय आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया यांच्यासुद्धा महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट २५ जानेवारी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.