बहुप्रतिक्षीत ‘पठाण’ चित्रपट येत्या २५ जानेवारीला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तब्बल चार वर्षांच्या विश्रांतीनंतर शाहरुख पुन्हा एकदा अभिनयाच्या जादूने प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.

शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाने प्रदर्शनाआधीच कोट्यवधींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या आत्तापर्यंत एक मिलियनहून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे. ‘पठाण’ चित्रपटाने प्रदर्शनाआधीच तब्बल २० कोटींचा गल्ला जमवला आहे. अक्शन थ्रिलर असणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. काही तासांतच पठाणच्या ट्रेलरला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले होते.

हेही वाचा>>पंतप्रधान मोदींच्या अंदमान-निकोबारवरील २१ बेटांच्या नामकरणाच्या निर्णयाचं अजय देवगणने केलं कौतुक, म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पठाण’ चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यामुळे वाद निर्माण झाला होता. या गाण्यात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकिनी परिधान करुन रोमान्स केल्यामुळे वादंग सुरू होता. त्यामुळे पठाण चित्रपट बॉयकॉट ट्रेण्डमध्येही अडकला होता. परंतु, याचा कोणताही परिणाम चित्रपटावर होताना दिसत नाही आहे. प्रदर्शनापूर्वीच चित्रपट कोटींची कमाई करत आहे.

हेही पाहा>> Photos: अथिया शेट्टीच्या वाढदिवशी के.एल.राहुलने दिलेली प्रेमाची कबुली, जाणून घ्या त्यांची फिल्मी लव्हस्टोरी

शाहरुख खान मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटात दीपिका पदुकोण व जॉन अब्राहमही महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. शाहरुखच्या चाहत्यांनी काही ठिकाणी संपूर्ण थिएटरच बूक केल्याचं वृत्त आहे.