Bigg Boss OTT 2: बिग बॉसच्या घरात स्पर्धकांना रोज नवनवीन टास्क दिले जात आहेत. घरातील स्पर्धकही देण्यात येणारे टास्क मोठ्या उत्साहाने करत आहेत. बिग बॉसच्या घरात नुकताच एक टास्क झाला, यामध्ये सर्व सदस्यांना एकमेकांना १ ते ९ पर्यंत रँकिंग द्यायची होती. यासाठी प्रत्येकाने इतर स्पर्धकांना आपल्याला चांगली रँकिंग देण्यासाठी मनधरणी करायची होती. पण पूजा भट्टने मात्र ती स्वतःला रँकिंग देऊ शकत नसल्याचं म्हटलं.

पूजा भट्टचे लग्न का मोडले? मुलं का झाली नाहीत? अभिनेत्रीने पूर्वाश्रमीच्या पतीबाबत ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये केले खुलासे

जेव्हा पूजा भट्टला इतर घरातील सदस्यांना स्वतःला पहिल्या क्रमांकावर ठेवण्यासाठी पटवून द्यायची वेळ आली, तेव्हा ती म्हणाली, “मी वूमन कार्ड खेळत नाही. मी थेट संवाद साधण्यावर विश्वास ठेवते, नजर मिळवून मी लोकांशी समोरासमोर बोलू शकते. इतक्या वर्षांच्या यशस्वी करिअरनंतर मला बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी होण्यासाठी बोलावण्यात आलं याचं कारण माझे मत आणि व्यक्तिमत्त्व आहे. मी नेहमी सूचनांचे पालन करते आणि अधिकारपदावर असलेल्या लोकांच्या आदेशांचा आदर करते.”

महेश भट्ट यांच्याशी लग्न करण्याचा आलिया भट्टच्या आईला होता पश्चाताप, सावत्र लेक पूजाचा मोठा खुलासा

पूजा पुढे म्हणाली, “माझा स्वतःला रँकिंग देण्यावर विश्वास नाही; मी ते कधीच केलं नाही. जेव्हा मी बिग बॉसच्या ओटीटीच्या घरात प्रवेश केला तेव्हापासून मी पहिल्या क्रमांकावर आहे, असं कधीच वागले नाही, प्रेक्षकांनी मला पहिल्या क्रमांकावर ठेवले. घरातील सहकाऱ्यांनी मला दिलेल्या कोणत्याही रँकिंगवर मी समाधानी आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पहिली रँकिंग हवी आहे म्हणून मी हे बोलत नाही. मला स्पॉटलाइट, कॅमेरा किंवा लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं नाही. मी या इंडस्ट्रीत जन्माला आले आहे आणि शेवटपर्यंत त्याचा एक भाग राहीन. तुमच्यापैकी कोणीही माझे प्रतिस्पर्धी नाही, त्यामुळे बिग बॉसनंतर माझे आयुष्य संपणार नाही. केवळ लक्ष वेधण्यासाठी मी माझ्या चाहत्यांना निराश करणार्‍या गोष्टी करणार नाही,” असं पूजा म्हणाली.