सोशल मीडियावर असंख्य कंटेंट क्रिएटर्स आहेत. पण काही कंटेंट क्रिएटर्सनी आपल्यातल्या वेगळ्या कौशल्याने नेटकऱ्यांसह सेलिब्रिटींची मनं जिंकली आहे. त्यापैकी एक म्हणजे २४ वर्षांची कंटेट क्रिएटर चांदनी भाभदा. सोशल मीडियावर ती चांदनी मिमिक म्हणून खूप प्रसिद्ध आहे. चांदनी आलिया भट्टची हुबेहुब मिमिक्री करते. तिच्या या कौशल्याचे आलियाने देखील कौतुक केलं होतं. अशा या लोकप्रिय कंटेंट क्रिएटर चांदनी भाभदाने अक्षय कुमारचा फ्लॅट खरेदी केल्याचं समोर आलं आहे.

चांदनी भाभदाने अक्षय कुमारचा अंधेरीतला फ्लॅट खरेदी केला आहे. तिने गृहप्रवेश करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पहिल्या दोन फोटोंमध्ये चांदनी पूजा-अर्चा करताना दिसत आहे. तर तिसऱ्या फोटोमध्ये डोक्यावर कलश घेऊन गृहप्रवेश करताना चांदनी दिसत आहे. हे गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे, “वयाच्या २५ वर्षांच्या आधी घर खरेदी केलं. घराचा ईएमआय भरत आहे.”

हेही वाचा – अभिनेत्री पल्लवी सुभाष रमली ‘या’ क्षेत्रात, जाणून घ्या ती सध्या काय करते?

अवघ्या वयाच्या २४व्या वर्षी चांदनीने स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केल्यामुळे कलाकार मंडळींसह, इतर कंटेंट क्रिएटर्स व चाहते तिला शुभेच्छा देत आहेत. नुपूर सेनॉन, सई गोडबोले, अभिषेक निगम, असीस कौर अशा अनेकांनी चांदनीला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: मधुरा वेलणकरची बहीण झळकणार ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत, साकारणार महत्त्वाची भूमिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, चांदनीचे इन्स्टाग्रामवर 495k फॉलोअर्स आहेत. तिने वकिलीचे शिक्षण घेतले आहे. ती व्हीजे म्हणजे व्हिडीओ जॉकी आहे. पण ती पूर्णपणे वेळ कंटेंट क्रिएटरचं काम करते.