सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटावर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. काहींनी हा चित्रपट प्रपोगांडा असल्याचं म्हटलं आहे. तर काही ठिकाणी या चित्रपटावर बंदीही घालण्यात आली होती. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता प्रकाश राज यांनी ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे.

प्रकाश राज सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. समाजातील अनेक घडामोडींवर ते ट्वीटरद्वारे व्यक्त होताना दिसतात. प्रकाश राज यांनी नुकतंच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

हेही वाचा>> ‘द केरला स्टोरी’चे शो जर्मनीतही हाऊसफुल! तिकीट बुकिंगचा फोटो शेअर करत अदा शर्मा म्हणाली…

“प्रिय सुप्रीम लीडर, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी काल्पनिक प्रपोगांडा असलेल्या या चित्रपटाचं प्रमोशन करुन त्याचा वापर करण्यामागे तुमचा काय विचार होता? Just Asking” असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. प्रकाश राज यांच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही पाहा>> समुद्रकिनारा व बिकिनीतील हॉट मिताली मयेकर, मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड लूक पाहून चाहते घायाळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बंगाल राज्यात या चित्रपटावर घालण्यात आलेली बंदी न्यायालयाने उठवली आहे. ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट पहिल्या दिवसापासूनच कोटींची कमाई करत आहे. या चित्रपटाने १५ दिवसांत १६७.८६ कोटींची कमाई केली आहे.