नकारात्मक भूमिका वठवून लोकप्रियता मिळविणारे अभिनेते प्रकाश राज हे आपल्या अभिनयासह स्पष्टवक्तेपणासाठीही खूप प्रसिद्ध आहेत. त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटांबरोबर बॉलीवूड चित्रपटांमध्येही आपल्या दमदार भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. बऱ्याचदा प्रकाश राज त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विरोधात व्यावसायिक चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारतात. याबद्दल विचारलं असता आपण पैशांसाठी अशा भूमिका करत असल्याचं प्रकाश राज मान्य करतात.

‘फिल्म कम्पॅनियन’शी बोलताना प्रकाश राज म्हणाले, “मी काही फालतू चित्रपट फक्त पैशांसाठी करतो. ते मला विचारतात, ‘तू इतका जोरात का बोलतोस?’ मी म्हणतो, ‘जर मी ओव्हरॅक्ट करू शकतो, तर मी खूप अभिनय करू शकतो. मी व्यावसायिक चित्रपटांचा तिरस्कार करत नाही कारण त्या चित्रपटांना प्रेक्षक आहेत, निर्माते आहेत आणि त्या चित्रपटांसाठीही तितकीच मेहनत लागते. त्या चित्रपटांमध्ये त्यांना खलनायक म्हणून माझी गरज असते.”

“गीतांजलीच्या ब्राची पट्टी ओढून…”, ‘त्या’ सीनबद्दल ‘अ‍ॅनिमल’ फेम अभिनेत्याची प्रतिक्रिया

प्रकाश राज यांनी काही चित्रपट कोणतंही मानधन न घेता केले आहेत. त्यामागचं कारणही त्यांनी सांगितलं. “माझी बुद्धी म्हणते, ‘प्रकाश, तू असा मूर्खपणा का करतोस?’ मी म्हणतो, ‘मला थोडे पैसे हवे आहेत, त्यामुळे मी ते करणार. कधी कधी इतर कोणतरी म्हणतं, ‘तुम्ही तो चित्रपट फुकट का करत आहात?’ पण माझे पेमेंट पैशांमध्ये आहे की वेगळ्या स्वरुपात हा निर्णय मी घेतो. फुकटात चित्रपट करून मला मिळणारे बक्षीस तुम्ही पाहू शकत नाही, कारण तुम्ही फक्त त्याचे पैशात मोजमाप करत आहात आणि मी तसं करत नाही. मी नेहमीच माझ्या अटींवर आयुष्य जगत आलो आहे.”

“तुमच्या मुलाला खूप…”, ‘अ‍ॅनिमल’ मध्ये रणबीर कपूरसह काम केल्यानंतर दिग्गज अभिनेत्याने नीतू कपूर यांना केला होता मेसेज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, यावर्षी आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहिलेले प्रकाश राज पुढील वर्षी चार तेलुगू चित्रपटांमध्ये दिसणार आहेत. यामध्ये महेश बाबू स्टारर मसाला चित्रपट ‘गुंटूर कारम’, ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर आणि सैफ अली खान यांचा अॅक्शन ‘ड्रामा देवरा’, पवन कल्याण आणि इमरान हाश्मी यांचा ओजी, आणि अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2: द रुल’ यांचा समावेश आहे.