बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा सध्या चर्चेत आहे. गेल्या अनेक काळापासून प्रीती मनोरंजन विश्वापासून दूर आहे. प्रीती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच प्रीतीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करत गेल्या आठवडाभरात तिला आलेल्या दोन वाईट अनुभवांवर भाष्य केलं आहे.

“या आठवड्यात घडलेल्या दोन घटनांमुळे मी पूर्णत: हादरले आहे. पहिली घटना माझ्या लहान मुलगी जियाबरोबर घडली आहे. एका महिलेला माझ्या मुलीबरोबर फोटो काढायचा होता. परंतु, मी नकार दिल्यानंतर त्या तिथून निघून गेल्या. थोड्यावेळाने त्या पुन्हा आल्या आणि जबरदस्तीने जियाला किस गेलं. जियाच्या गालावर किस केल्यानंतर “काय छान मुलगी आहे” असं म्हणत त्या तिथून निघून गेल्या. माझी मुलं बागेत खेळत असताना हा प्रकार घडला. मी सेलिब्रिटी नसते तर मी या प्रकाराव खूप वाईट पद्धतीने रिअॅक्ट केलं असतं. पण मला कोणत्याही प्रकारचा ड्रामा करायचा नव्हता,” असं प्रीतीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> Video: हास्यजत्रेतील ‘अवली लवली’ची ‘मुंबई इंडियन्स’लाही भुरळ, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूचा व्हिडीओ व्हायरल; नम्रता संभेराव कमेंट करत म्हणाली…

दुसऱ्या घटनेबद्दल भाष्य करताना प्रीतीने पापाराझींना फटकारलं आहे. प्रीती म्हणते, “दुसऱ्या घटनेचा व्हिडीओ तुम्ही पाहू शकता. एक दिव्यांग व्यक्ती माझ्याकडे पैसे मागत आहे. पण, मला फ्लाइट पकडण्यासाठी उशीर होत होता, म्हणून मी त्याला नकार दिला. शिवाय माझ्याकडे पैसे नसून फक्त क्रेडिट कार्ड असल्याचंही मी त्याला सांगितलं. माझ्याबरोबर असलेल्या महिलेने त्याला थोडे पैसेही दिले. परंतु, तरीही तो माझ्या गाडीच्या पाठीमागे येत होता. या व्यक्तीला मी आधीही खूप वेळा पैसे दिले आहेत. पण, यावेळी पैसे न दिल्याने तो राग व्यक्त करत माझ्या गाडीच्या पाठीमागे येत असल्याचं व्हिडीओतही दिसत आहे.”

हेही वाचा>> अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ची बॉलिवूड अभिनेत्याने उडवली खिल्ली, म्हणाला “हे पोस्टर पाहून…”

“हा सगळा प्रकार फोटोग्राफरला मजेशीर वाटत आहे. आम्हाला मदत करण्याऐवजी त्यांनी हा व्हिडीओ शूट केला आणि हे सगळं पाहून ते हसत होते. गाडीचा पाठलाग करू नकोस, असं त्याला कोणीही सांगितलं नाही. जर त्याला दुखापत झाली असती, तर सगळ्यांनी मला दोषी ठरवलं असतं. सेलिब्रिटी असल्याने मला प्रश्न विचारले गेले असते. मला वाटतं आता तरी लोकांनी हे मान्य केलं पाहिजे की सर्वात आधी मी एक माणूस आहे, त्यानंतर मी एक आई आणि त्यानंतर सेलिब्रिटी आहे. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात,” असं म्हणत प्रीतीने संताप व्यक्त केला आहे.

हेही पाहा>> “‘सैराट’आधी माझ्याकडे एकही मुलगी बघत नव्हती” आकाश ठोसरचं वक्तव्य, म्हणाला “आता एक्स गर्लफ्रेंड…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे प्रीती म्हणते, “माझ्या मुलांबरोबर फोटो काढण्यासाठी त्यांच्या जवळ येऊ नका. ते सेलिब्रिटी नाहीत. ती लहान मुलं आहेत आणि त्यांच्याकडे त्याच दृष्टीकोनातून पाहिलं पाहिजे. दुसरं म्हणजे, जे फोटोग्राफर्स आम्हाला फोटो, व्हिडीओसाठी विनंती करतात, त्यांनी माणुसकीही दाखवली पाहिजे. पुढच्या वेळी शूट करुन हसण्यापेक्षा मदत केली पाहिजे.” प्रीती झिंटाच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत तिला पाठिंबा दिला आहे.