बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा सध्या तिच्या संसारामध्ये रमली आहे. वर्षभरापूर्वी प्रितीच्या घरी जुळ्या मुलांचं आगमन झालं. सरोगसीद्वारे दोन मुलांची आई झाली असल्याचं तिने सोशल मीडियाद्वारे सांगत सगळ्यांना गुड न्यूज दिली. पती जीन गुडइनफ व प्रितीसाठी हा क्षण अगदी आनंदाचा होता. सोशल मीडियाद्वारे ती आपल्या मुलांचे फारसे फोटो व व्हिडीओ शेअर करताना दिसत नाही. पण आता प्रितीने आपल्या मुलांच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – “३०० रुपयांसाठी डान्सबारमध्ये मी…” पहिल्यांदाच ‘बिग बॉस’च्या घरात खासगी आयुष्याबाबत बोलला साजिद खान

प्रितीला जुळी मुलं झाल्यानंतर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. वयाच्या ४६व्या वर्षी ती आई झाली. तिला एक मुलगा व मुलगी आहे. जय व जिया अशी तिच्या जुळ्या मुलांची नावं आहेत. आज प्रितीच्या जुळ्या मुलांचा पहिला वाढदिवस आहे. यानिमित्त प्रितीने खास पोस्ट शेअर केली.

प्रितीने लेकीचा फोटो शेअर करत म्हटलं की, “मला नेहमीच माहित होतं की तू माझ्या आयुष्यामध्ये येणार आहेस. मी तुझ्यासाठी प्रार्थना केली आणि आज तू इथे माझ्यबरोबर आहेस. हास्य, सहवास आणि मिठी यासाठी जिया आयुष्यभर मी तुझी ऋणी राहिन. माझ्या लहान बाहुलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी तुझ्यावर खूप प्रेम करते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी आयुष्यामध्ये अनेक भूमिका साकारल्या. पण खऱ्या आयुष्यात आई ही भूमिक साकारताना इतर भूमिका त्यापुढे फिक्या वाटतात. मी प्रत्येक दिवशी तुझ्यावर खूप प्रेम करते. वाढदिवसाच्या शुभेच्छा मेरी जान.” असं लेकाचा फोटो शेअर करत प्रितीने आपलं प्रेम व्यक्त केलं. प्रितीची ही दोन्ही मुलं फारच गोंडस आहेत.