अक्षय कुमारला बॉलिवूडमध्ये ‘खिलाडी कुमार’ म्हणूनही ओळखले जाते. अक्षय कुमार बॉलिवूडमधील अशा कलाकारांपैकी एक आहे ज्यांना चित्रपटासाठी सर्वाधिक फी मिळते. काही वर्षांपूर्वी अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीनंतर अक्षय कुमार चर्चेत आला होता. या मुलाखतीतअक्षय कुमार पंतप्रधान मोदींना राजकारणाव्यतिरिक्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक मनोरंजक प्रश्न विचारला होता. यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अक्षयची पत्नी ट्विंकलवर अशी कमेंट केली, जी ऐकून अक्षयलाही हसू आवरता आले नाही.

हेही वाचा- “नाटू नाटूला माझ्यामुळे ऑस्कर मिळाला” अजय देवगणचं ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये वक्तव्य, म्हणाला…

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अक्षय कुमार याला म्हणाले होते की, तुझे कौटुंबिक आयुष्य खूप छान जात असेल ना? कारण मी तुझे आणि ट्विंकल खन्नाचे ट्विटर बघतो. ट्विंकल खन्ना तिचा संपूर्ण राग हा माझ्यावरच काढते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे बोलणे ऐकून अक्षय कुमार हसताना दिसला.  ट्विंकल नेहमीच सामाजिक मुद्द्यांवर आपले मत मुक्तपणे व्यक्त करताना दिसते. अनेकवेळा ती केंद्र सरकारवरही टीका करतानाही दिसते. मोदीजी गंमतीने म्हणाले की ट्विंकल खन्ना आपला राग त्यांच्यावर काढते. पीएम मोदींच्या या उत्तरावर मोदींसह अक्षयकुमारलाही हसू आवरता आले नाही.

हेही वाचा- “पप्पूला घाबरले” राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर स्वरा भास्करचं ट्वीट, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अक्षय कुमारने ही मुलाखत पीएम मोदींच्या निवासस्थानी घेतली होती. ही मुलाखत प्रेक्षकांना खूप आवडली. अक्षय कुमार अलीकडेच इमरान हाश्मीसोबत ‘सेल्फी’ या चित्रपटात दिसला, जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. या चित्रपटात नुसरत भरूच आणि डायना पेंटी देखील मुख्य भूमिकेत दिसल्या आहेत.