भारतीय चित्रपटसृष्टीतील सगळे मापदंड मोडीत काढणाऱ्य अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस. आज ह महानायक ८० वर्षांचा झाला. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचं योगदान हे अतुलनीय आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात या नावाला जे वलय प्राप्त झालं आहे ते पाहून आपण सगळेच थक्क होतं. असा महानायक शतकातून एकदाच होतो हे अगदी तंतोतंत खरं आहे. सोशल मीडियावर सगळ्यांनी अमिताभ बच्चन यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

सगळ्यांनी अमिताभ बच्चन यांना शुभेच्छा देत त्यांना उत्तम आरोग्य लाभो अशी ईश्वराकडे प्रार्थना केली आहे. चित्रपटसृष्टीतील मातब्बर लोकांनी बच्चन यांचा शुभेच्छा दिल्या आहेतच. शिवाय राजकीय नेत्यांनीदेखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. नुकतंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीदेखील ट्वीट करून बच्चन यांना मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा : बॅटमॅन सुपरमॅनप्रमाणे अमिताभ बच्चन यांचंही आलं होतं कॉमिक बुक; तुम्हाला माहितीये का?

पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिलं की, “अमिताभ बच्चन यांना ८० व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. तुम्ही देशातील सर्वात श्रेष्ठ आणि अद्भुत अशा सिनेकलाकारांपैकी एक आहात ज्यांनी कित्येक पिढ्यांचं मनोरंजन केलं आहे. तुम्हाला सुखी आणि समृद्ध आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.” मोदींप्रमाणेच इतर सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांनी बच्चन यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

८० वर्षं पूर्ण होण्याच्या निमित्ताने मध्यंतरी अमिताभ बच्चन यांचे जून चित्रपट पुन्हा काही चित्रपटगृहात प्रदर्शित केले होते. या उपक्रमालाही लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. शिवाय अमिताभ यांचे नवीन आलेले ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘गुडबाय’ या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. आता बच्चन सुरज बडजात्या यांच्या ‘उंचाई’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.