Priyanak Chopra Rejected Salman Khan’s Superhit Film : सलमान खान व प्रियांका चोप्रा ही बॉलीवूडमधील दोन मोठी नावं. आजवर दोघांनी अनेक चित्रपटांतून विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. हे दोघे ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटातून एकत्र झळकलेले.
२००४ साली प्रदर्शित झालेला ‘मुझसे शादी करोगी’ चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. यातील गाणी व प्रियांका-सलमान यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडलेली. या चित्रपटानंतर दोघे पुन्हा एकदा एकत्र झळकणार होते, परंतु एनवेळी प्रियांकाने चित्रपटातून माघार घेतली. सलमान व प्रियांका यांची ‘भारत’ चित्रपटासाठी निवड झालेली. त्यावेळी प्रेक्षकांमध्येही खूप उत्सुकता होती. परंतु, त्यांची उत्सुकता फार काळ टिकली नाही, कारण प्रियांकाने या चित्रपटात काम करायला नाकार दिलेला.
सलमान खानने मानले प्रियांका चोप्राचे आभार
‘डीएनए’च्या वृत्तानुसार सलमान खानने प्रियांकाच्या या निर्णयाबद्दल प्रतिक्रिया देत म्हटलेलं की, “‘भारत’पेक्षा तिने युएसएची निवड केली. तिने आजवर इथे काम केलं आणि आता जेव्हा तिला तिच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा चित्रपट मिळाला तेव्हा तिने चित्रपटाला नकार देत लग्न करण्याचा निर्णय घेतला, यासाठी तिला सलाम आहे. एरवी लोक चित्रपटासाठी नवऱ्याला सोडतात. यासाठी खरंच धन्यवाद प्रियांका, मी तिचा आभारी आहे.”
सलमान खान पुढे म्हणालेला, “‘भारत’चं काम काही दिवसांत सुरूच होणार होतं; त्याआधी तिने मला भेटून तिला या चित्रपटात काम करायला जमणार नाही असं सांगितलेलं. त्यामुळे जर प्रियांकाने चित्रपटातून माघार घेतली नसती तर कतरिना कैफची निवड कशी झाली असती?”
‘भारत’ चित्रपटात पुढे प्रियांका चोप्राच्या जागी कतरिना कैफची निवड करण्यात आली. तिला यासाठी विचारण्यात आल्यानंतर तिने लगेच होकार दिला. तिच्यासह या चित्रपटात जॅकी श्रॉफ, तब्बू, दिशा पाटनी हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकलेले.
सलमान खान व कतरिना कैफचा हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३२१ कटींची कमाई केली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता.
प्रियांकानेही २०२० मध्ये याबद्दल मिड डेशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिलेली. ती म्हणालेली, “मी एक गोष्ट सांगेन, जर याबद्दल कुठलीही प्रतिक्रिया देण्याची गरज असती तर आजवर तुम्हाला ती मिळाली असती. तो खूप छान आहे. मला त्याच्याकडून प्रेरणा मिळते. तो आमच्या रिसेप्शनलाही आलेला. आम्ही त्याच्या घरी गेलो होतो. माझे व त्याची बहीण अरपिताचे खूप चांगले संबंध आहेत.”