Priyanka Chopra Brother Wedding Video: ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा लग्नबंधनात अडकला आहे. सिद्धार्थने अभिनेत्री नीलम उपाध्यायशी लग्नगाठ बांधली. सिधार्थ व नीलम यांच्या लग्नातील पहिला व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये या दोघांच्या लग्नातील झलक पाहायला मिळत आहे.

सिद्धार्थ चोप्राने लग्नात आयव्हरी रंगाची शेरवानी घातली होती, तर नीलमने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. प्रियांकाने आकाशी रंगाचा सुंदर डिझायनर इंडो वेस्टर्न लेहेंगा परिधान केला होता. लग्नाच्या स्टेजवर प्रियांका चोप्रा भाऊ सिद्धार्थला घेऊन आली. तर, नीलमने गाण्यावर तिथे एंट्री केली, नंतर प्रियांकाने नीलमचं स्वागत केलं आणि तिला मंचावर घेऊन गेली. यावेळी निक जोनास व कुटुंबातील इतर सदस्य जबाबदाऱ्या पार पाडताना दिसले.

सिद्धार्थ व नीलम यांच्या लग्नातील खास व्हिडीओ

सिद्धार्थ व नीलम यांच्या लग्नाआधीचे कार्यक्रम २-३ दिवसांपासून सुरू होते. हळदी व मेहंदी समारंभ दणक्यात पार पडला. त्यानंतर त्यांचा संगीत सोहळा गुरुवारी रात्री पार पडला. त्यांच्या संगीत सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आज सिद्धार्थ व नीलमचे मुंबईत लग्न झाले. त्यांच्या लग्नाला मनारा चोप्रा व तिचे कुटुंबीय तसेच परिणीती चोप्रा व तिचे पती राजकारणी राघव चड्ढा यांनी हजेरी लावली होती. रेखा व नीता अंबानीदेखील सिद्धार्थच्या लग्नाला उपस्थित राहिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिद्धार्थ चोप्राबद्दल बोलायचं झाल्यास तो प्रियांकाचा धाकटा भाऊ आहे. तो बहीण प्रियांकाचे प्रॉडक्शन हाऊस पर्पल पेबल पिक्चर्स सांभाळतो. तसेच त्यांनी हॉटेल व्यवसायही केला आहे. सिद्धार्थ त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिला. कारण दोनदा त्याचं लग्न साखरपुड्यानंतर मोडलं. त्याने गर्लफ्रेंड कनिका माथुरशी साखरपुडा केला होता, पण तो मोडला. त्यानंतर २०१९ मध्ये त्याने इशिता कुमारशी साखरपुडा केला होता, पण लग्नाच्या काही दिवसांआधीच ते वेगळे झाले. तो साखरपुडा मोडल्यानंतर काही काळाने त्याच्या आयुष्यात अभिनेत्री नीलम उपाध्याय आली. दोघेही एकमेकांना डेट करू लागले. त्यानंतर त्यांनी २०२४ मध्ये साखरपुडा केला. त्यांच्या साखरपुड्याला प्रियांका चोप्रा व निक जोनास आले होते. आता दोघांचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं आहे. चाहते सिद्धार्थ व नीलमला नवीन प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत.