अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या चर्चेत आहे. नुकतीच तिची ‘सिटाडेल’ ही सीरिज प्रदर्शित झाली आहे. आता तिचा ‘लव्ह अगेन’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच ‘लव्ह अगेन’ चित्रपटाचा प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. या प्रीमिअरला प्रियांका चोप्रा पती निक जोनाससोबत पोहोचली होती. या दरम्यानचा प्रियांकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रियांकाला रेड कार्पेटवर पाहताच हॉलीवूड स्टार सॅम ह्यूघन तिच्याजवळ आला. आणि त्याने तिला किस केले. किस करताना प्रियांकाने पाऊट केले पण सॅमने तिच्या मानेवर किस दिले. फोटोमध्ये सॅम प्रियांकाच्या नाकावर किस करताना दिसत आहे.

प्रियांका चोप्राच्या या चित्रपटात तिचा पती निक जोनासही दिसणार आहे. या चित्रपटात निकची छोटी भूमिका आहे. निकच्या भूमिकेबद्दल बोलताना प्रियांका म्हणाली की, ‘निकला विचारले की तू ही भूमिका करू शकतोस का? निकने यासाठी होकार दिला.

हेही वाचा- ‘मेट गाला’मध्ये कलाकारांना खायला दिले विचित्र पदार्थ; यादी आली समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘लव्ह अगेन’मध्ये प्रियांका चोप्रा जोनास एका महिलेची भूमिका साकारत आहे. हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. सिटाडेलच्या प्रमोशननंतर आता प्रियांका तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच प्रियांका पती निकसोबत ‘मेट गाला’ २०२३ च्या रेड कार्पेटवर दिसली होती. मेटगालामधील तिच्या लूकबरोबरच तिने गळ्यात घातलेल्या हाराची चर्चा रंगली होती.