हिंदी चित्रपटसृष्टीत आजही अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या मानधनात बरीच तफावत आहे. आज स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवून जरी बरेच चित्रपट बनत असले तरी अभिनेत्यांपेक्षा अभिनेत्रींचं मानधन बरंच कमी असतं. शिवाय बॉलिवूडमध्ये आजही वर्णभेदाचा सामना करावा लागतो. याबाबत अभिनेत्री प्रियांका चोप्राने वक्तव्य केलं आहे. बीबीसीच्या ‘१०० यशस्वी महिलांच्या ‘ यादीत चार भारतीय महिलांपैकी एक नाव प्रियांकाचं आहे. प्रियांकाने बॉलिवूडप्रमाणेच हॉलिवूडमध्येही स्वतःचं एक अढळ स्थान निर्माण केलं आहे.

या दोन्ही चित्रपटसृष्टीत काम केल्याने प्रियांकाला या गोष्टीचा दांडगा अनुभव आहे. याबाबतीत प्रियांकाने मोठा खुलासा केला आहे. बॉलिवूडमध्ये तिला बऱ्याचदा रंगावरून टोमणे मारले गेले आहेत याबद्दलही तिने वक्तव्य केलं आहे. शिवाय चित्रपटाच्या सेटवरील व्यवहार आणि एकूणच बॉलिवूडची कार्यप्रणाली यावरही प्रियांकाने टीका केली आहे. हॉलिवूडमध्ये काम करताना मात्र असा अनुभव आला नसल्याचंही प्रियांकाने स्पष्ट केलं आहे.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Pakistani actor Imran Abbas claims he was offered Aashiqui 2
“आशिकी २, पीके, हीरामंडीची ऑफर मिळाली होती,” पाकिस्तानी अभिनेत्याचा दावा; म्हणाला, “महेश भट्ट…”
ice cream rice
सई ताम्हणकरप्रमाणे तुम्ही खाऊ शकता का आईस्क्रिम भात? विचित्र खाद्यपदार्थाचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

वर्णभेदाबद्दल बोलताना प्रियांका म्हणाली, “मला बऱ्याचदा ‘काळी मांजर आणि ‘सावळी’ म्हणून संबोधलं जायचं. मला या शब्दाचा अर्थ कधीच समजला नाही कारण आपल्या देशातील प्रत्येकाच्या स्कीनचा रंग हा तसाच आहे. मी सुंदर नसल्याने मला खूप मेहनत घ्यावी लागेल असं मला नेहमीच वाटायचं. ज्या अभिनेत्रींची त्वचा थोडी उजळ आहे त्यांच्यापेक्षा अभिनयात मी नक्कीच उजवी होते असं मला वाटायचं, पण वर्णभेद हा इतका सर्रास होता की मला त्याची सवय झाली.”

आणखी वाचा : अभिनेत्रींना मिळणाऱ्या कमी मानधनाबद्दल प्रियांका चोप्राने व्यक्त केली नाराजी; म्हणाली…

रुसो ब्रदर्स यांच्या आगामी साय-फाय सिरिज ‘सीटाडेल’मध्ये प्रियांका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ही वेबसीरिज प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. याबरोबरच बऱ्याच वर्षांनी प्रियांका बॉलिवूड चित्रपटातही झळकणार आहे. फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटात प्रियांका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात प्रियांकाबरोबर आलिया भट्ट आणि कतरिना कैफ या अभिनेत्री झळकणार आहेत.