बॉलीवूडपासून हॉलीवूडपर्यंतचा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या हैदराबादमध्ये आहे. ती एसएस राजामौली यांच्या आगामी चित्रपटात काम करणार अशा चर्चा आहेत. तिने आज हैदराबादच्या जवळ असणाऱ्या चिलकूर बालाजी मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले. यासह तिने दाक्षिणात्य अभिनेता राम चरणच्या पत्नीचेही आभार मानले.

प्रियांका चोप्राने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती पांढर्‍या रंगाच्या सलवार सूटमध्ये, नो-मेकअप लूकसह दिसत आहे. तिने डोक्यावर ओढणी घेतली असून आणि कपाळावर गंध लावला आहे.

प्रियांका चोप्राने या फोटोंसह कॅप्शनमध्ये लिहिले, “श्री बालाजींच्या आशीर्वादाने एका नवीन अध्यायाला सुरुवात होत आहे. आपल्यातील प्रत्येकाच्या हृदयात शांतता, समृद्धी नांदो. देवाची कृपा असीम आहे. ॐ नमो नारायणाय.” तिने आपल्या पोस्टमध्ये राम चरणच्या पत्नी उपासना कामिनेनीचेही आभार मानले आहेत.

यापूर्वी प्रियांका चोप्रा महाकुंभात सहभागी झाली आहे अशी अफवा पसरली होती . खरंतर, तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामुळे अनेकांना तो व्हिडीओ की तो प्रयागराजमधील आहे असे वाटले होते. मात्र, ती हैदराबादमध्ये होती.

पाहा फोटोज –

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रियंका चोप्राने २००२ मध्ये तामिळ चित्रपट ‘थमिझन’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर ‘द हिरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला. २०१७ मध्ये ‘बेवॉच’ चित्रपटाद्वारे ती हॉलीवूडमध्ये पोहोचली. ती ‘हेड्स ऑफ स्टेट’ आणि ‘द ब्लफ’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.