Priyanka Chopra : अभिनेत्री प्रियांका चोप्रा कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. या देसी गर्लने नुकतंच तिच्या इन्टाग्राम अकाउंटवर केलेल्या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही पोस्ट आहे तिच्या भावाच्या साखरपुड्याची. अभिनेेत्री प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा आणि नीलम उपाध्याय यांचा हस्ताक्षर विधी आणि साखरपुड्याचा कार्यक्रम २६ ऑगस्ट रोजी पार पडला. साखरपुड्याचा क्रार्यक्रम घरच्या घरी साध्या पद्धतीने विधिवत करण्यात आला. या कार्यक्रमात कुटुंबातील माणसे, नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते.

काय म्हणाली प्रियांका चोप्रा?

भावाच्या साखरपुड्याचा व्हिडीओ पोस्ट करीत कॅप्शनमध्ये प्रियांका चोप्रा लिहिते, ‘… आणि त्यांनी ते करून दाखवलं.’ आमच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त मित्र आणि कुटुंबीयांच्या आशीर्वादाने आज त्यांचा हस्ताक्षर विधी आणि साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. अशा आशयाची पोस्ट तिने भाऊ सिद्धार्थ आणि त्याची होणारी पत्नी नीलम यांचा उल्लेख करत केली. काही वर्षांपूर्वीच प्रियांका चोप्राच्या वडिलांनी या जगाचा निरोप घेतला. असे असले तरी प्रियांका आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाने तिच्या वडिलांच्या आठवणी जपून ठेवल्या आहेत. प्रियांका चोप्राच्या वडिलांचा वाढदिवस २६ ऑगस्ट रोजी असतो. याच दिवसाचे औचित्य साधत सिद्धार्थ आणि नीलम यांनी आपल्या आयुष्याची नवी सुरुवात वडिलांच्या आशीर्वादाने केली आहे.

हेही वाचा – “सुशांतच्या निधनानंतर मी नैराश्यात…”, रिया चक्रवर्ती म्हणाली, “पुन्हा एकदा…”

हेही वाचा – Kangana Ranaut : “..तर कंगना रणौत यांचा शिरच्छेद करु”, धमकीचा व्हिडीओ मेसेज आल्याने खळबळ

साखरपुड्याच्या कार्यक्रमातील सिद्धार्थ आणि नीलम यांच्या फोटोंना सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दिली आहे. सिद्धार्थनेही त्याच्या इन्टाग्राम अकाउंटवरून साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले आहेत. गुलाबी रंगाचा घागरा आणि गळ्यात नाजूक नेकलेस नीलमने परिधान केला होता. तसेच सोनेरी रंगाच्या पारंपरिक ड्रेसमधल्या सिद्धार्थच्या लुकचेही सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साखरपुड्याच्या निमित्ताने संपूर्ण चोप्रा कुटुंब एकत्र येऊन या जोडीला शुभाशीर्वाद दिले. सिद्धार्थ आणि नीलम यांच्या साखरपुड्यात प्रियांका चोप्रा खूपच सुंदर दिसत होती. प्रियांकाने नारंगी रंगाचा ड्रेस घातला होता. केसाचा अंबाडा बांधत तिने पिवळ्या रंगाचं फूल माळलं होतं. सिद्धार्थ हा प्रियांकाचा लहान भाऊ आहे. त्यामुळे साखरपुड्याच्या कार्यक्रमात या जोडीने प्रियांका चोप्राच्या पाया पडत तिचे शुभाशीर्वाद घेतले आहेत. दरम्यान, प्रियांका चोप्रा खास भावाच्या लग्न विधींसाठी भारतात आली आहे. साखरपुड्याआधी झालेल्या प्री-वेडिंग सोहळ्यात अभिनेत्रीने मजंठा रंगाची डिझायनर साडी नेसली होती. तिच्या या लूकचं सोशल मीडियावर कौतुक करण्यात आलं होतं.