World Champions Team India : भारतीय संघाने पहिल्यांदाच महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चे जेतेपद पटकावले आहे. दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी विजय मिळवून भारतीय संघाने इतिहास रचला. महिला क्रिकेटपटूंच्या कामगिरीनंतर देशभरात सेलिब्रेशन सुरू आहे. बॉलीवूड कलाकारांनी महिला संघाच्या या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
विकी कौशलने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून भारतीय महिला संघाचं अभिनंदन केलं.
WORLD CHAMPIONS!!!
आपल्या महिला खेळाडूंनी अविश्वसनीय कामगिरी केली. खेळावर एकतर्फी वर्चस्व होतं. बॅटिंग, बॉलिंग आणि खासकरून फिल्डिंग… अभिनंदन टीम इंडिया.. आम्हाला हा आनंद दिल्याबद्दल तुमचे आभार, अशी पोस्ट विकी कौशलने केली आहे.
मी निळ्या रंगाच्या जर्सीतल्या हिरोंना पाहत मोठी झाले… ते सगळे आज तिच्यासारखे दिसत होते.
World champions. अभिनंदन टीम इंडिया, अशी पोस्ट प्रियांका चोप्राने केली आहे.
World Champions! इतिहास घडला आणि आपण त्याचे साक्षीदार झालो!
ही फक्त एक मॅच नव्हती… हा क्षण आपल्याबरोबर बराच काळ राहील असा होता.
टीम इंडिया तुमचा खूप अभिमान आहे. शेफाली आणि रिचा उत्तम खेळल्या. संपूर्ण टीमने झोकून दिलं.
ऐतिहासिक दिवस येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देईल आणि हे करू शकतो, असा आता अनेक तरुणींना विश्वास बसेल, अशी पोस्ट मनोज बाजपेयी यांनी केली आहे.
अनुष्का शर्माने टीम इंडियाच्या विजयानंतर पोस्ट केली आहे.

माझ्या कॉलेजच्या मैदानावर मुलींनी इतिहास रचला. अभिनंदन टीम इंडिया, अशी पोस्ट कार्तिक आर्यनने केली आहे.

कियारा अडवाणीची टीम इंडियासाठी पोस्ट

