बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने हॉलीवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, प्रियांकाचा बॉलीवूड ते हॉलीवूड हा प्रवास सोपा नव्हता. अभिनेत्रीच्या आयुष्यात सुरुवातीचा असा एक काळ होता जेव्हा तिला चित्रपटात काम करण्याची अजिबात इच्छा नव्हती. याबाबत प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनी खुलासा केला आहे.

हेही वाचा : “…तर माझे ३० चित्रपट झाले असते”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे कास्टिंग काऊचबद्दल गंभीर आरोप

प्रियांकाने २००० साली मिस वर्ल्ड ही स्पर्धा जिंकली. सौंदर्य स्पर्धा जिंकल्यावर अनेक अभिनेत्री चित्रपटांकडे वळत असल्याचे आपण पाहिले आहे. पण, प्रियांकाच्या बाबतीत असे काहीच झाले नाही. एका मुलाखतीत याबाबत मधु चोप्रांनी खुलासा केला आहे. त्या म्हणतात, “मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी प्रियांकाने एक वर्षाचा गॅप घेतला होता. स्पर्धा जिंकून आपण बॉलीवूडमध्ये काम करू असा कोणताच विचार प्रियांकाने केला नव्हता.”

हेही वाचा : सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त आलिया भट्टची खास पोस्ट; नीतू कपूर यांचा फोटो शेअर करत म्हणाली, “क्वीन…”

मधु चोप्रांनी पुढे सांगितले, “प्रियांकाला पुढे शिक्षण सुरु ठेवायचे होते. त्यानंतर आम्ही आग्रह केला म्हणून तिने बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला होता. स्पर्धा जिंकून ती मुंबईत आल्यावर साहजिकच तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. ती यासाठी तयार नव्हती. तेव्हा प्रियांका म्हणायची, मला हे सगळं करायचे नाहीये…मला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आम्हीच तिला म्हणालो की संधी वारंवार येत नाहीत.”

हेही वाचा : “स्वच्छतागृह नसल्याने दिवसभर…” रेणुका शहाणेंनी सांगितला ‘तो’ जुना किस्सा; म्हणाल्या, “माधुरी दीक्षितने फार सांभाळले”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आम्ही प्रियांकाला समजावले की, एका चित्रपट करून बघ. तुला या क्षेत्रात आवड निर्माण नाही झाली, तर तू कधीही पुन्हा अभ्यास करू शकतेस. एका चित्रपटानंतर तुला आवड निर्माण झाली नाही, तर आम्ही तुझ्या इच्छेनुसार निर्णय घेऊ. यानंतर तिने चित्रपटांच्या ऑफर्सला होकार दिला. चित्रपटासाठी पहिला करार करताना ती प्रचंड रडली होती. ‘तुम्ही मला हे काय करायला सांगत आहात’ हेच बोलून रडत होती. पण, जेव्हा तिने पहिल्यांदा कॅमेरा फेस केला तेव्हा सगळे बदलले आणि पुढे प्रियांकाने यातच आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला.” असे मधु चोप्रांनी सांगितले.