पुलकित सम्राट व क्रिती खरबंदा बॉलीवूडमधील लोकप्रिय कलाकार आहेत. गेल्या काही वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे समोर आले होते. आता लवकरच ते लग्नबंधनात अडकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरून त्यांनी साखरपुडा केला असल्याची चर्चा सुरू आहे. आता त्यांच्या लग्नाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

क्रितीने १४ फेब्रवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त इन्स्टाग्रामवर एक रोमॅण्टिक पोस्ट शेअर केली होती. या फोटोमध्ये ती पुलकितबरोबर हातात हात घालून उभी असल्याचे दिसून येत आहे. या फोटोला तिने, ‘चला एकत्र मार्च साजरा करुया’, अशी कॅप्शनही दिली आहे. या फोटोवरून पुलकित व क्रिती येत्या मार्च महिन्यात लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत मार्चमध्ये लग्न करणार आहात का, असा प्रश्न विचारला आहे.

काही दिवसांपूर्वीच पुलकित व क्रितीचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये दोघांच्या हातात अंगठी दिसून आली होती. यावरून दोघांनी गुपचूप साखरपुडा केला असल्याची चर्चा सुरू होती. दोघांकडून अद्याप लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हेही वाचा- रकुल-जॅकी गोव्यातील ‘या’ आलिशान हॉटेलमध्ये बांधणार लग्नगाठ; एका रात्रीचे भाडे तब्बल…

पुलकित सम्राटने ३ नोव्हेंबर २०१४ रोजी सलमान खानची बहीण श्वेता रोहिराबरोबर लग्न केले होते. लग्नाच्या एका वर्षामध्येच पुलकित व श्वेताने घटस्फोट घेतला. लग्नानंतर पुलकितचे नाव यामी गौतमीबरोबर जोडले गेले होते, त्यामुळेच त्यांचा संसार तुटल्याचे सांगण्यात येते. २०१८ मध्ये पुलकित व यामीचेही ब्रेकअप झाले. ४ जून २०२१ रोजी यामीने दिग्दर्शक आदित्य धरबरोबर लग्नगाठ बांधली.

हेही वाचा- लेक ईशा देओल-भरत तख्तानीच्या घटस्फोटावर हेमा मालिनी काय म्हणाल्या? घ्या जाणून

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुलकित व क्रिती गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघे सध्या लिव्ह इनमध्ये राहत असल्याचे सांगण्यात येते. पुलकित व क्रितीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर काही महिन्यांपूर्वीच पुलकितचा ‘फुक्रे ३’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली होती, तर क्रिती लवकरच ‘रिस्की रोमियो’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच दोघे ‘तैश’, ‘पागलपंती’ आणि ‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटात एकत्र झळकले होते.