शतकातील सुपरहिरो म्हणून ओळखले जाणारे अभिनेते अमिताभ बच्चन त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. अमिताभ त्यांच्या अभिनयाबरोबरच आपल्या दमदार आवाजासाठीही ओळखले जातात. बॉलिवूडमध्ये अँग्री यंग मॅन म्हणून ओळखले जाणाऱ्या अमिताभ यांचा एका चित्रपटाच्या शूटींगदरम्यान पारा एकदम वाढला होता. अमिताभ एवढे चिढले होते की सेटवरील सगळेच घाबरले होते. दिग्दर्शक आर बाल्की यांनी एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता.

हेही वाचा- ‘पीके’ फेम अभिनेत्रीचं दुसरं लग्न मोडलं, १३ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय; म्हणाली…

आर बाल्की आणि अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. यामध्ये ‘चीनी कम’, ‘पा’ आणि ‘शमिताभ’ या चित्रपटांचा समावेश आहे. त्यांचे बाँडिंगही अप्रतिम आहे. दोघे लवकरच ‘घूमर’मध्ये एकत्र दिसणार आहेत. बाल्की यांनी एका मुलाखतीत अमिताभ यांच्याशी संबंधित एक मजेदार किस्सा सांगितला. बाल्की म्हणाले, एकदा बिग बी अचानक सेटवर ओरडायला लागले होते. ते सेटवर कधीही कोणावर रागावत नाही. पण त्या दिवशी त्यांनी सगळ्यांनाच धक्का दिला.

हेही वाचा- विजय वर्माने लाडाने तमन्नाला दिलं टोपण नाव; पोस्ट शेअर करत म्हणाला…

बाल्की पुढे म्हणाले की “अमिताभ ‘अचानक आरडाओरडा करू लागले. त्यामुळे सगळेच हादरले. त्यांना यापूर्वी ओरडताना कोणी पाहिले नाही. त्यानंतर मी अमिताभ यांच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये गेलो. मला काहीतरी गडबड झाल्याचे जाणवले. मी विचारलं, काय झालं? जेवण ठीक आहे का? तू का ओरडत आहेस? अमिताभ बच्चन यांनी माझ्याकडे बघितले आणि पुन्हा ओरडला आणि म्हणाला, त्या मुलाला बोलवा.’ मी पुन्हा त्यांना विचारलं ‘अमित जी काय प्रॉब्लेम आहे? आज सकाळपासून तुला काय झालंय? अमिताभ त्यांना म्हणाले, तू मुर्ख आहेस, मी कॅरेक्टरमध्ये आहे.” अमिताभ यांच्या स्पष्टीकरणानंतर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला होता.