R Madhavan on his son: आर. माधवन असा अभिनेता आहे, ज्याच्या अनेक भूमिका गाजल्या. त्यामुळे आर. माधवनच्या चित्रपटांची कायमच चर्चा होताना दिसते. ‘रहना है तेरे दिल में’, ‘तनु वेड्स मनू’, ‘३ इडियट्स’ अशा अनेक चित्रपटांतील भूमिकांसाठी आर माधवन ओळखला जातो.

चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता असूनही त्याच्याकडे त्याच्या मुलाइतकी शिस्त नाही, असे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने कबूल केले. आर माधवनचा मुलगा वेदांत हा व्यावसायिक जलतरणपटू आहे.

आर. माधवन काय म्हणाल?

आर माधवनने नुकतीच जीक्यूला मुलाखत दिली. या मुलाखतीत आर. माधवनने त्याच्या मुलाची दिनचर्या सांगितली. वेदांत काय आणि किती वाजता आहार घेतो, तो किती वाजता झोपतो आणि किती वाजता उठतो यावर त्याने वक्तव्य केले.

अभिनेता म्हणाला, “वेदांत एक व्यावसायिक जलतरणपटू आहे, त्याचा दिवस पहाटे चार वाजता सुरू होतो आणि आठ वाजता संपतो. हे फक्त त्याच्यासाठी नाही, त्याच्या आई-वडिलांसाठी म्हणजेच आमच्यासाठी कठीण काम आहे. पहाटे चार वाजताची वेळ ही ब्रम्ह मुहूर्त असते, असे म्हटले जाते. हा उठण्यासाठी आध्यात्मिकदृष्ट्या सर्वात अनुकूल काळ असल्याचे सांगितले जाते.”

पुढे अभिनेता म्हणाला की, वेदांतमध्ये माझ्या आणि सरितामधील सर्वोत्तम गोष्टी आहेत. त्याची ६ फूट ३ इंच उंची आहे. त्याचे जलतरणपटूचे शरीर आहे. तो शिस्तबद्ध आयुष्य जगतो. इतकेच काय, जेवण करणे हेदेखील त्याच्यासाठी व्यायाम करण्यासारखेच आहे. तो फक्त जेवण करायचे आहे म्हणून जेवायला बसत आहे. जेवणाचा घास चावून खाण्याकडे आणि इतर गोष्टींकडे त्याचे लक्ष असते. माझ्याकडे त्याच्याइतकी शिस्त असती तर बरे झाले असते. मला वाटते की मी थोडा आळशी आहे.

वेदांत मलेशियन ओपनमध्ये पाच वेळा सुवर्णपदक विजेता, डॅनिश ओपनमध्ये सुवर्ण आणि रौप्यपदक विजेता तसेच लॅटव्हियन आणि थायलंड ओपनमध्ये ब्राँझपदक विजेता आहे. कॉमनवेल्थ यूथ गेम्समध्येही तो पाचव्या स्थानापर्यंत पोहोचला होता.

पुढे अभिनेत्याने पालकत्वाबाबतही वक्तव्य केले. आर माधवन म्हणाला की सध्याची मुले अति जागरुक आहेत, त्यामुळे त्यांच्याशी बोलताना विचार करून बोलले पाहिजे. तसेच त्यांच्यावर आपली मते लादू नयेत. वेदांत पाच वर्षांचा असल्यापासून मी मोठ्यांशी ज्या पद्धतीने बोलतो, तसंच मी त्याच्याशीसुद्धा बोलतो. मी त्याची मतं गांभीर्याने घेतली आहेत.

पालक म्हणून तुम्ही तुमची मतं त्यांना सांगू शकता. त्यांच्या अवतीभोवतीचे वातावरण सुरक्षित आहे याची खात्री करू शकता. महत्त्वाचे म्हणजे घर हे असे ठिकाण असायला हवे, तिथे ते जसे खरे आहेत, तसे राहू शकतील. त्यांना कोणीतरी जज करत आहे असे त्यांना वाटणार नाही.

“मला माझ्या मुलाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग व्हायचे आहे. भविष्यात माझ्या नातवडांनी मला थाथा म्हणून हाक मारली पाहिजे. त्यांनी मला सतत भेटत राहिले पाहिजे. माझी इच्छा आहे की त्याने कधीतरी मला विचारावे, बाबा, तुम्ही मला कसे वाढवले? अर्थात, मी त्याच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकत नाही, मात्र त्याला माहीत आहे की जेव्हा काही महत्त्वाचे असेल, तेव्हा मी नेहमीच उपस्थित राहीन. आम्ही रोज बोलत नाही किंवा ‘आय लव्ह यू’ म्हणत नाही, पण जेव्हा त्याला कशाचेतरी उत्तर पाहिजे असते किंवा कशावरही बोलायचं असतं, तेव्हा तो मलाच फोन करतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आर माधवन आणि सरिता यांची भेट १९९१ साली झाली होती. १९९९ मध्ये त्यांनी लग्न केले. २००५ साली वेदांतचा जन्म झाला.