अभिनेत्री परिणीती चोप्रा गेल्या काही दिवसांपासून तिच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने 'आम आदमी पार्टी'चे खासदार राघव चड्ढा यांच्याबरोबर साखरपुडा केला. त्या दोघांच्या साखरपुड्याची खूप चर्चा रंगली होती. तर सध्या या साखरपुड्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. या साखरपुड्याच्या आधी राघव चड्ढा यांनी त्यांच्या नाकावर शस्त्रक्रिया करून घेतली असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. राघव आणि परिणीती राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधणार, अशा सध्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, राघव चड्ढा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राघव चड्ढा त्यांच्या नाकाच्या शस्त्रक्रियेबद्दल बोलतांना दिसत आहेत. हा व्हिडीओ राघव आणि परिणीतीच्या साखरपुड्यातील एका फोटोग्राफरने शेअर केला. आणखी वाचा : परिणीतीचा शाही थाट! साखरपुड्यात अभिनेत्रीने राघव चड्ढाला घातली ‘इतक्या’ किमतीची अंगठी या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये राघव चड्ढा हे परिणीतीच्या कुटुंबीयांशी बोलताना दिसत आहेत. यात एक महिला राघवला विचारते की आपण स्वतःमध्ये बाहेरून काही बदल केला आहे का? यावर राघव म्हणतात, "होय, मी नाकाची छोटी शस्त्रक्रिया केली. माझं नाक आधी माझ्या आईसारखं होतं, मात्र आता मी ते माझ्या वडिलांसारखं केलं आहे. राघव चड्ढा यांचा हा व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. परंतु हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर काही काळातच त्या फोटोग्राफरने डिलीट केला आहे. हेही वाचा : उत्सवमूर्ती परिणीती, पण थाट प्रियांकाचा! बहिणीच्या साखरपुड्यात देसी गर्लने नेसलेल्या साडीची किंमत तब्बल… राघव नाकाच्या शस्त्रक्रियेबद्दल बोलायला लागताच परिणीती त्यांना सावध करताना व्हिडीओत दिसते. इथे कॅमेरे आहेत आणि तुम्ही जे बोलताय ते सगळं रेकॉर्ड होत आहे, असं ती त्यांना म्हणताना दिसते. पण तरीही हा व्हिडीओ व्हायरल झालाच. आता नेटकरी सोशल मीडियावरून याबद्दल विविध प्रतिक्रिया देत आहेत