Raghav Chadha Give Hints About Good News : बॉलीवूडच्या सध्या चर्चेत असणाऱ्या कपलपैकी एक म्हणजे अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि तिचे पती, खासदार राघव चड्ढा. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा नुकतेच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये दिसले. त्यांनी शोमध्ये एकमेकांबद्दल अनेक खुलासे केले आणि मजेदार गोष्टी सांगितल्या.
यावेळी शोदरम्यान कपिल आणि राघव यांच्यातील गप्पांमध्ये एका गोष्टीचा उल्लेख झाला, ज्यामुळे परिणीती थोडीशी अवाक झाली. हिंदुस्तान टाइम्सनुसार, शोमध्ये कपिल स्वतःच्या आयुष्यातला एक किस्सा सांगतो. तो म्हणतो की, लग्नानंतर त्याच्या आईनं त्याला लगेचच मुलं जन्माला घालण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर कपिल परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा त्याच्या विनोदी शैलीत म्हणतो, “लवकर प्लॅन करा, नाहीतर कुकरमध्ये प्रेशर वाढेल!”
यावर राघव हसत-हसत म्हणतो, “देंगे, आपको जल्दी गुड न्यूज देंगे…” त्याचं हे वाक्य ऐकून परिणीती थोडीशी दचकते आणि हसू आवरण्याचा प्रयत्न करते. यावर कपिल मग लगेच विचारतो, “गुड न्यूज येणार आहे का? लाडू वाटायला सुरुवात झाली का?” त्यावर राघव पुन्हा मिश्किलपणे हसत म्हणतो, “देंगे… कभी तो देंगे!” त्यामुळे आता परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा कधी गुडन्यूज देणार? याची चाहते वाट पाहत आहेत.
परिणीती आणि राघव यांच्या नात्याबद्दल सांगायच झाल्यास, १३ मे २०२३ रोजी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये त्यांचा साखरपुडा पार पडला. या कार्यक्रमाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह अनेक राजकीय मान्यवर उपस्थित होते. यानंतर २४ सप्टेंबर २०२३ रोजी दोघांनी उदयपूरमधील लीला पॅलेस या आलिशान ठिकाणी लग्न केलं.
View this post on InstagramThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.
दरम्यान, परिणीतीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, २०११ मध्ये ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’ या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारत बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती ‘इशकजादे’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली. यानंतर तिने ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘हसी तो फसी’, ‘दावत ए इश्क’, ‘किल दिल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ती शेवटची ‘अमर सिंग चमकीला’ चित्रपटात झळकली.