Raid 2 box office collection Day 18: राज कुमार गुप्ता दिग्दर्शित ‘रेड २’ हा चित्रपट १ मे २०२५ ला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अजय देवगण व रितेश देशमुख प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

रेड २ मध्ये अभिनेता रितेश देशमुख एका वेगळ्या भूमिकेत दिसत आहे. त्याने या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे. अजय देवगणसह रितेश देशमुखच्या भूमिकेचेदेखील कौतुक होताना दिसत आहे.

बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या १८ दिवसांत संपूर्ण देशभरातून या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला प्रेम मिळत असल्याचे बॉक्स ऑफिसवरील कमाईच्या आकड्यांवरून समोर येत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने किती कमाई केली, हे जाणून घेऊयात.

‘रेड २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

रेड २ या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच उत्तम कमाई करत असल्याचे पाहायला मिळत आहे. १८ व्या दिवशी ५.६५ कोटींची कमाई केली आहे. गेल्या १८ दिवसांत या चित्रपटाने एकूण १४९.१५ कोटींची कमाई केली आहे. तर, जगभरात २०१.६० कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आता हा चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे.

रेड या चित्रपटाने एकूण १५४ कोटींची कमाई केली होती होती. त्यामुळे आता रेड २ दमदार कमाई करत ‘रेड’ या चित्रपटाला मागे टाकले आहे. छावा या चित्रपटानंतर सिंकदर हा २०२५ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. आता रेड २ ने सलमान खानच्या सिंकदर या चित्रपटाला गेल्या आठवड्यात मागे टाकले आहे. याबरोबरच, सध्या कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याने रेड २५० कोटींचा टप्पा पूर्ण करू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

रितेश देशमुख हिंदीसह मराठी चित्रपटांतदेखील भूमिका साकारताना दिसतो. अभिनयाबरोबरच तो चित्रपट निर्मितीदेखील करतो. याबरोबरच रितेश देशमुखने ‘बिग बॉस मराठी ५’चे सूत्रसंचालन केले आहे. आता ‘रेड २’मधील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे.

दरम्यान, चित्रपटात रजत कपूर, सौरभ शुक्ला, श्रुती पांडे, सुप्रिया पाठक, अमित सियाल, ब्रिजेंद्र काला आणि यशपाल शर्मा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.आता रेड २ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.