Raid 2 Box Office Collection : बॉलीवूड अभिनेता अजय देवगण आणि रितेश देशमुख यांची मुख्य भूमिका असलेला ‘रेड २’ हा चित्रपट १ मे, २०२५ रोजी प्रदर्शित झाला. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रेड’ चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला होता. या चित्रपटातील अजय देवगण व सौरभ शुक्ला ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. तेव्हापासून चाहते ‘रेड’ चित्रपटाच्या सीक्वेलची प्रतीक्षा करत होते आणि अखेर १ मे रोजी ‘रेड २’ चित्रपट प्रदर्शित झाला.

‘रेड २’ रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ‘रेड २’नं २०२५ मधील विक्की कौशलचा ‘छावा’ चित्रपट वगळता सर्व चित्रपटांना मागे टाकलं आहे आणि वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटानं प्रदर्शनाचे तीन आठवडे पूर्ण केले आहेत आणि चौथ्या आठवड्यात प्रवेश केला आहे. ‘रेड २’नं प्रदर्शनाच्या चौथ्या शुक्रवारी म्हणजेच, २३ व्या दिवशी किती कमाई केली? ते सविस्तर जाणून घेऊयात…

अजय देवगणचा ‘रेड २’ हा चित्रपट २४ दिवसांनंतरही चित्रपटगृहांमध्ये सुरू आहे. या चित्रपटाने जगभरात २०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ‘रेड २’ चित्रपटाने पहिल्या दिवशी १९.७१ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर कधी कमाईत घट झाली तर कधी वाढ पाहायला मिळाली. ‘रेड २’नं प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात ९५.७५ कोटी रुपये कमावले होते. मग दुसऱ्या आठवड्यात ‘रेड २’चं कलेक्शन ४०.६ कोटी रुपये होते. तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाने २०.५ कोटी रुपयांची कमाई केली.

सॅकनिल्कनुसार, ‘रेड २’ने भारतात आतापर्यंत १५७.६९ कोटींची कमाई केली आहे. २३ व्या दिवशी चित्रपटाने १ कोटी रुपये कमावले होते, तर आज २४ व्या दिवशी, संध्याकाळी ५:०५ वाजेपर्यंत, चित्रपटाचं कलेक्शन ०.८४ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. याबद्दल रितेशनेही त्याच्या सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. कमाईच्या आकड्यांची खास पोस्ट रितेशने शेअर केली आहे आणि या पोस्टसह त्याने ‘वर्षातील सर्वात मोठ्या ‘रेड’जगाचे लक्ष लागलं आहे’ असं म्हटलंय.

दरम्यान, ‘रेड २’बद्दल सांगायचं झालं तर, अमय पटनायक (अजय देवगण) या आयकर विभागातील प्रामाणिक अधिकाऱ्यावर लाच मागितल्याचा आरोप होतो आणि त्याची बदली केली जाते. यानंतर तिथला स्थानिक राजकारणी दादाभाईबद्दल (रितेश देशमुख) अमयला संशय येतो आणि तो त्याच्या घरी, कार्यालयात तो छापा टाकतो. यानंतर दोघांमध्ये होणारी खडाजंगी या चित्रपटात पहायला मिळते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘रेड २’मध्ये अजय देवगण आणि रितेश देशमुखने यांच्याशिवाय यशपाल शर्मा, अमित सियाल आणि बृजेंद्र काला यांनीसुद्धा विशेष छाप सोडली आहे. चित्रपटात रितेशच्या आईची भूमिका साकारणाऱ्या सुप्रिया पाठक आणि अजयच्या बॉसच्या भूमिकेतील रजत कपूर यांनीही उल्लेखनीय काम केलं आहे. २०० कोटींचा टप्पा यशस्वीरित्या पार केल्यानंतर ‘रेड २’ आणखी किती रुपयांचा पल्ला गाठणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.