विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द व्हॅक्सिन वॉर’ शुक्रवारी (२८ सप्टेंबर) प्रदर्शित झाला. चित्रपटाची सुरुवात खूप संथ झाली. पहिल्या दिवसाची आकडेवारी निराशाजनक राहिली. या चित्रपटात नाना पाटेकर, पल्लवी जोशी, अनुपम खेर, रायमा सेन यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर रायमाने आपल्याला तिरस्काराचा सामना करावा लागत असल्याचं म्हटलं आहे.

‘द व्हॅक्सिन वॉर’मध्ये नाना पाटेकर यांना स्वतःच्या भूमिकेत पाहून भावुक झाले डॉ. बलराम भार्गव, म्हणाले…

या चित्रपटात रायमाने रोहिनी सिंग धुलिया नावाच्या पत्रकाराची भूमिका साकारली आहे. काही आठवड्यांपूर्वी तिचा चित्रपटातील पहिला लूक शेअर करण्यात आला, त्यावरून तिला ट्रोल करण्यात आल्याचं रायमाने सांगितलं. “मला तिरस्कार आणि ट्रोलिंगचा सामना करावा लागला. खरं तर माझी भूमिका जशी आहे त्यावरून अशा गोष्टी घडतील असं मला वाटलं होतं. पण लूक प्रदर्शित होताच या गोष्टी घडल्या. मला ट्रोल केलं गेलं, लोकांनी मला सोशल मीडियावर अनफॉलो केलं आणि मला बऱ्याच नकारात्मक गोष्टी म्हटल्या गेल्या,” असं ती म्हणाली.

नाना पाटेकर यांच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’कडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, पहिल्या दिवसाची कमाई निराशाजनक, वाचा आकडे

“एक कलाकार म्हणून मला प्रेक्षकांना इतकंच म्हणायचं आहे की मला हवी असलेली कोणतीही भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक वाटत असेल तर मी निवडू शकते. असा चित्रपट घेतल्याबद्दल कलाकारांना ट्रोल का व्हावं लागतं हे मला समजत नाही. अभिनय हेच आमचं काम आहे. मी कोणत्या राजकीय पक्षाबद्दल पक्षपाती आहे असं नाही. मी फक्त एक अभिनेत्री म्हणून ही भूमिका केली. लोकांना मी नकारात्मक भूमिका साकारणारी वाटत नाही,” असंही रायमा म्हणाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘द काश्मीर फाइल्स’च्या यशानंतर विवेक अग्निहोत्रींचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट आला. देशातील करोना काळातील परिस्थितीवर बेतलेला हा चित्रपट आहे. या चित्रपटात स्वदेशी लस निर्मितीची कहाणी सांगण्यात आली आहे.