Raj Kundra on Shilpa Shetty: शिल्पा शेट्टी ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेकदा सोशल मीडियावरील तिचे व्हिडीओ लक्ष वेधून घेतात. तसेच अभिनेत्री तिच्या फिटनेससाठीदेखील ओळखली जाते. तिच्या योगाभ्यसाचे व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.
राज कुंद्रा काय म्हणाला?
आता अभिनेत्री पती राज कुंद्रामुळे चर्चेत आली आहे. राज कुंद्राने नुकतीच ‘फिल्मीज्ञान’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत राज कुंद्राने शिल्पा शेट्टीबाबत वक्तव्य केले. राज कुंद्रा म्हणाला, “गेल्या १५ वर्षात आमच्या आयुष्यात चढ-उतार आले. पण, आम्ही कायमच एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो. कोणत्याही नात्यात हेच अपेक्षित असते. जर ते धरुन ठेवावं लागत असेल तर ते कशा प्रकारचं नातं आहे? जर तुमचं तुमच्या जोडीदारावर प्रेम असेल तर ते नात्यातही असतं. तो किंवा ती व्यक्ती जर तुमची असेल, तर कायमच तुमच्याकडे परत येईल.”
“जर समोरच्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यातून जायचं असेल, तिला जाऊ द्या. लग्न ही सगळ्यात अवघड गोष्ट असते. लग्नानंतर दोन-तीन वर्षे प्रेम राहतं. त्यानंतर तुम्ही पालक बनता. तुमच्यावर जबाबदाऱ्या येतात. तुम्हाला तुमचे नाते मजबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.”
“शिल्पा आणि मी एका गोष्टीची खूप काळजी घेतो, ती म्हणजे आम्ही आमची शुक्रवारची डेटनाइट चुकवत नाही. आम्ही दर शुक्रवारी रात्री बाहेर जातो. एकमेकांबरोबर वेळ घालवतो. माझी मुले विचारतात की तुम्ही कुठे जात आहात, तेव्हा मी त्यांना सांगतो की आतापर्यंत मी तुमच्याबरोबर वेळ घालवला. आता मी आईबरोबर वेळ घालवणार आहे. मी नेहमी शिल्पाला सांगतो की भारतातील आई-वडील त्यांच्या मुलांना खूप महत्व देतात.
पुढे राज कुंद्रा म्हणाला, “मी सगळ्यांना हे सांगू इच्छितो की तुमचे तुमच्या जोडीदाराबरोबर नाते चांगले खूप महत्वाचे असते. कारण, मुलं मोठी झाल्यानंतर ते लग्न करून दुसरीकडे जातात. त्यामुळे, तुम्ही फक्त तुमच्या मुलांचे संगोपन करण्यातच खूप वेळ देत असाल तर तुमचे तुमच्या जोडीदाराबरोबरचे नाते तितके घट्ट राहणार नाही. तुम्हाला नंतर या गोष्टीचा पश्चाताप होईल की तुम्ही तुमच्या जोडीदाराला पुरेसा वेळ दिला नाही. त्यामुळे मला असे वाटते की तुम्ही तुमच्या जोडीदाराला प्राथमिकता दिली पाहिजे.
शिल्पाने २२ नोव्हेंबर २००९ रोजी उद्योगपती राज कुंद्रा यांच्याशी लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत. राजला भेटण्यापूर्वी शिल्पा बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री होती. दरम्यान, राज कुंद्रा लवकरच पंजाबी चित्रपट ‘मेहेर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.