बॉलीवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान व नुपूर शिखरे यांचा रिसेप्शन सोहळा मुंबईत पार पडला. आज (१३ जानेवारी रोजी) झालेल्या या सोहळ्यात बॉलीवूडकरांनी हजेरी लावली. इतकंच नाही तर राजकीय नेतेही या सोहळ्याला उपस्थित राहिले. आमिरच्या लेकीच्या रिसेप्शन सोहळ्यात ठाकरे कुटुंबाने हजेरी लावली.

या रिसेप्शन सोहळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह हजेरी लावली. यावेळी त्यांनी माध्यमांना पोजही दिल्या. राज व शर्मिला यांचा रिसेप्शनमधील व्हिडीओ ‘फिल्मीज्ञान’ या पापाराझी अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

आयरा खान-नुपूर शिखरेच्या लग्नाचे मुंबईत रिसेप्शन; शाही सोहळ्यातील फोटो पाहिलेत का?

आयरा व नुपर यांच्या रिसेप्शन सोहळ्याला राज ठाकरे यांच्याशिवाय त्यांच्या वहिनी व पुतण्यांनी हजेरी लावली. रश्मी ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे तिघेही या रिसेप्शन सोहळ्याला पोहोचले होते. त्यांनी फोटोंसाठी पोज दिल्याचं पाहायला मिळालं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आयरा व नुपूर यांचा जंगी रिसेप्शन सोहळा मुंबईत पार पडला. या सोहळ्या बॉलीवूड कलाकारांसह दाक्षिणात्य कलाकारही उपस्थित होते. धर्मेंद्र, वहीदा रेहमान, मुमताज, सायरा बानो, हेमा मालिनी, रेखा, जया बच्चन, अनिल कपूर या मंडळींचे रिसेप्शनमधील व्हिडीओ व फोटो चर्चेत आहेत.