Rajinikanth’s upcoming film Coolie ticket price: बॉलीवूडचे असे काही चित्रपट आहेत, ज्यांनी रेकॉर्ड तयार केले. थिएटरमध्ये अधिक काळ चालणारा चित्रपट, बॉक्स ऑफिसवर कमी दिवसांत खूप कमाई करणारा चित्रपट, अधिक तासांचा चित्रपट, अनेक गाणी असणारा चित्रपट ते सगळ्यात कमी काळ चालणारा चित्रपट, असे चित्रपटांच्या बाबतीत अनेक रेकॉर्डस् पाहायला मिळतात.

दिग्गज अभिनेते रजनीकांत यांची प्रमुख भूमिका असलेला कुली हा चित्रपटदेखील नवीन रेकॉर्ड तयार करीत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या नवीन चित्रपटाच्या तिकीटाचे दर वाढले असल्याचे पाहायला मिळत आहेत. नेमके काय घडले आहे, ते जाणून घेऊयात. हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२५ ला प्रदर्शित होणार आहे.

‘कुली’ चित्रपटाच्या एका तिकिटाची किंमत किती?

कुली या चित्रपटात रजनीकांत यांच्यासह नागार्जुन अक्किनेनी, आमिर खान, श्रुती हासन, असे अनेक कलाकार प्रमुख भूमिकांत आहेत. आता चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच प्रेक्षक या चित्रपटासाठी उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. १४ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नईतील एका लोकप्रिय थिएटरने तिकिटाची किंमत तब्बल ४,५०० रुपये ठेवली आहे. पोल्लाचीमध्ये एका थिएटरमधील काही कर्मचारी पहिल्या दिवशीच्या पहिल्या शोची तिकिटे ४०० रुपयांना विकत असल्याचे कॅमेरामध्ये कैद झाले आहे.

अशा पद्धतीने तिकीटे विकणे हे तमिळनाडू सरकारच्या नियमांविरुद्ध आहे. तरीही अनेक थिएटर चाहत्यांच्या उत्सुकतेचा गैरफायदा घेत, चुकीच्या पद्धतीने किंवा ‘ब्लॅक’ने अवास्तव किमतीत तिकिटे विकली जात आहेत.

‘इंडिया टुडे’शी बोलताना रजनीकांतच यांचा एक चाहता म्हणाला, “मी चेन्नईतील सर्व लोकप्रिय थिएटरमध्ये माझे नशीब अजमावले आहे. कुली या चित्रपटाच्या तिकिटांची किंमत ६००, १००० रुपये आहे, ज्यामध्ये सर्वाधिक किंमत ४,५०० रुपये आहे. मी पहिल्या शोसाठी तिकिटे बुक करू शकत नाही. कारण- ती एक तर ब्लॉक झाली आहेत किंवा विकली गेली आहेत. माझ्यासारख्या चाहत्यांना ‘ब्लॅक’ तिकिटे खरेदी करण्याशिवाय किंवा सरकार-मान्यताप्राप्त दरात जेव्हा तिकिटे विकली जातील, तेव्हा आम्हाला चित्रपट पाहता येईल.”

आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार का, इतर चित्रपटांना कमाईच्या बाबातीत हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.