राजकुमार राव हा एक अष्टपैलू अभिनेता आहे. आजवर विविध चित्रपटांत त्याने काम करीत त्याच्या अभिनयाने अनेकांची मने जिंकली आहेत. सध्या तो ‘भूल चूक माफ’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. शुक्रवारी (२३ मे) त्याचा चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे. त्यामध्ये त्याच्यासह अभिनेत्री वामिका गब्बी मुख्य भूमिकेत आहे. गेले काही दिवस तो चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त मुलाखती देत आहे.
राजकुमार नुकताच ‘रीलेशनशिप अॅडव्हाइस’च्या नवीन एपिसोडमध्ये झळकला होता. यावेळी राजकमारने त्याच्या घरातील एक किस्सा सांगितला आहे. तो म्हणाला, “आमच्या घरी आम्ही एक स्वयंपाकी ठेवला होता, जो जवळपास वयाने ४८ वर्षांचा असेल. तो खूप चविष्ट जेवण बनवतो. मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा इतकं चांगलं शाकाहारी मेक्सिकन जेवणाचा आस्वाद घेत होतो. आतापर्यंत मी फक्त हिरव्या भाज्या आणि भात एवढंच खाल्लं आहे.”
याबाबत बोलताना राजकुमार पुढे म्हणाला, “दोन दिवसांनी माझी बायको पत्रलेखा मला म्हणाली की, तो माझ्याशी नीट बोलत नाही. मला असं वाटलं की, काहीतरी गडबड आहे. तेव्हा मी तिला मी बघतो, असं म्हटलं. नंतर तिसऱ्या दिवशी जेव्हा पत्रलेखानं त्याला काहीतरी सांगितलं तेव्हा त्यानं तिचं ऐकलं नाही; पण माझ्याशी मात्र तो नेहमी आदरानं बोलत असे. तेव्हा मी त्याला बोलावलं आणि म्हणालो की, तुम्ही तुमची बॅग घ्या आणि निघून जा.”
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी १५ नोव्हेंबर २०२१ साली लग्न केलं. या दोघांचा प्रेमविवाह आहे. तर आता यांच्या लग्नाला चार वर्षं झाली आहेत. पत्रलेखासुद्धा अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे.
दरम्यान, राजकुमार रावच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर शुक्रवारी २३ मे २०२५ रोजी त्याचा ‘भूल चूक माफ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. लवकरच त्याचा ‘मालिक’ हा आगामी चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. राजकुमार गेल्या वर्षभरात ‘विकी विद्या का वो वाला व्हिडीओ,’ ‘नाम,’ ‘भूल चूक माफ,’ ‘स्त्री २,’ ‘मिस्टर अॅंड मिसेस माही’ या चित्रपटांतून तो झळकला होता.