राजकुमार राव बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. स्त्री, न्यूटन या चित्रपटांमधील त्याच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. आता लवकरच त्याचा ‘श्री’ (SRI) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, ‘SRI’ बाबत मोठी माहिती समोर आली आहे.

‘श्री’ चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची वाट पाहत होते. आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. ‘श्री’ येत्या १७ मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट उद्योगपती श्रीकांत बोला यांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यामध्ये राजकुमार रावबरोबर अभिनेता ज्योतिका, अलाया एफ व शरद केळकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा- नवाजुद्दीन सिद्दीकीच्या लेकीने दुबईत घेतलेली तब्बल ‘एवढ्या’ किमतीची बॅग; अभिनेता म्हणाला…

तुषार हिरानंदानी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत; तर भूषण कुमार, कृष्ण कुमार व निधी परमार यांनी त्याची निर्मिती केली आहे. सुरुवातीला हा चित्रपट या वर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होणार होता; मात्र तारखेत बदल करण्यात आला असून, तो त्याच महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात प्रदर्शित करण्यात येणार आहे. टी-सीरिजच्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅण्डलवरून याबाबत एक पोस्टही शेअर करण्यात आली आहे. पोस्टमध्ये राजकुमार रावचा फोटो शेअर करण्यात आला आहे. ही पोस्ट शेअर करीत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, श्रीकांत बोला यांच्या अविस्मरणीय जीवनप्रवासावर आधारित ‘श्री’ चित्रपट १७ मे २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by T-Series (@tseries.official)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजकुमारच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास राजकुमार राव स्त्री २, मिस्टर अॅण्ड मिसेस माही, गन्स अॅण्ड गुलाब्स सीझन २ मध्येही दिसणार आहे. तसेच त्याचा ‘विकी विद्या का वो वाला व्हिडीओ’ चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या हृषिकेशमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू असून, त्यामध्ये त्याच्याबरोबर तृप्ती दिमरीची प्रमुख भूमिका आहे.