अभिनेत्री राखी सावंतच्या आईचं २८ जानेवारीला संध्याकाळच्या सुमारास निधन झालं. गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्या कॅन्सर आणि ब्रेन ट्यूमर या आजाराशी झुंज देत होत्या. पण आता आईच्या निधनानंतर राखीवर नवं संकट आलं आहे. पुन्हा तिने पती आदिल खान दुर्रानीवर गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. तसेच नवऱ्याचं अफेअर असल्याचंही राखीचं म्हणणं आहे.
आणखी वाचा – Video : “आमचं लग्न…” आईच्या निधनानंतर राखी सावंतचा नवा ड्रामा, ढसाढसा रडत लग्नाबाबत केलं भाष्य
याआधीही राखीने सात महिन्यानंतर आदिलशी लग्न झालं असल्याचं कबुल केलं. पण आदिलनेच लग्न लपवून ठेवल्याचा आरोप राखीने केला. दरम्यान आदिलने राखीबरोबर लग्न झालं असल्याचं मान्य केलं. त्यानंतर हे दोघं पुन्हा जवळ आले. आता पुन्हा एकदा राखी व आदिलमध्ये दुरावा निर्माण झाला आहे.
राखीने आदिलचं ज्या मुलीबरोबर अफेअर आहे तिला आता धमकी दिली आहे. राखी म्हणाली, “आता माझी आईच नाही तर यापुढे कोणतीही गोष्ट गमवल्याचं मला दुःख होणार नाही. मी ‘बिग बॉस मराठी’मध्ये जेव्हा दीड महिना होती तेव्हा त्याचा तू गैरफायदा घेतला आहेस. आता मी त्या मुलीचं नाव सांगत नाही. पण वेळ आल्यावर मी त्या मुलीचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करणार.”
आणखी वाचा – वनिता खरातच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात, अभिनेत्रीच्या होणाऱ्या नवऱ्यानेही हातावर काढली मेहेंदी
“हे मी मीडियाच्या माध्यमातून त्या मुलीला सांगू इच्छिते. म्हणूनच आदिल तू अफेअऱ करण्यासाठी आठ महिने लग्न लपवून ठेवलंस का? तू बोलतोस देवानंतर माझ्यासाठी फक्त तूच आहेस. पण असं काहीच नाही. पण देवाशी माझी तू तुलना करूच नको. मला एक पत्नी, मुलांची आई बनायचं आहे. तुमच्या दोघांचे फोटो व व्हिडीओ मी सध्या व्हायरल करत नाही. पण वेळ आल्यावर तेही करणार.” आता यावर आदिल खान प्रतिक्रिया देणार का? हे पाहावं लागेल.