ड्रामा क्वीन राखी सावंतच्या वैयक्तिक आयुष्यात सध्या बराच ड्रामा सुरू आहे. तिने आठ महिन्यांपूर्वी बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीशी लग्न केलं होतं, पण हे लग्न आता मोडणार असल्याचं दिसत आहे. राखीने आदिलवर मारहाण केल्याचे आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप केले आहेत. आईच्या निधनाच्या दिवशीही त्याने मारहाण केली होती, अशी माहिती राखीच्या भावाने दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा राखीच्या भावाने आदिलवर गंभीर आरोप केले आहेत.

Video : …अन् बोलता बोलता जमिनीवर कोसळली राखी सावंत, पती आदिल खानच्या अटकेनंतर अभिनेत्रीची झाली अशी अवस्था

राखीचा भाऊ व तिचा मित्र माध्यमांसमोर आले आणि त्यांनी काही फोटो दाखवले आहेत, ज्यामध्ये राखीच्या शरीरावर मारहाणीचे व्रण व जखमा दिसत आहेत. “हातावरची जखम फारच किरकोळ वाटत असेल, पण असं नाही. त्याने राखीच्या आईचं निधन झालं, त्याच दिवशी तिला मारहाण केली होती,” असं राखीच्या मित्राने सांगितलं. तसेच त्यांनी राखीचा कूपर हॉस्पिटलमधील मेडिकल रिपोर्ट दाखवला व तिच्या मानेवर मारहाणीच्या जखमा असलेला फोटोही दाखवला.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकीकडे हॉस्पिटलमध्ये आईचं निधन झालं होतं, तिला सावरण्याऐवजी आदिलने राखीला क्रूर पद्धतीने मारहाण केली, असे आरोप त्यांनी आदिलवर केले आहेत. कुणाबरोबरही राखी इतकं वाईट होऊ नये, असं ते म्हणाले. दरम्यान, राखीच्या तक्रारीनंतर आदिल खानला अटक करण्यात आली असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत.