ड्रामा क्वीन राखी सांवत रविवारी (९ जानेवारी) बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडली. तिला सेटवर बॉयफ्रेंड आदिल खान घ्यायला आला होता. घराबाहेर पडताच तिच्या आईला ब्रेन ट्युमर झाल्याचं राखीला कळालं होतं. दोन दिवस राखी आईच्या काळजीत असल्याचं दिसून येत होतं. अशातच कालपासून तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

या व्हायरल फोटोंमध्ये आदिल आणि राखी यांच्या गळ्यात वरमाला आणि हातात मॅरेज सर्टिफिकेट पहायला मिळत आहे. यावेळी राखीने पारंपरिक ड्रेस परिधान केला आहे, तर आदिलने फॉर्मल शर्ट आणि पॅंट परिधान केली आहे. तर दुसऱ्या फोटोत राखी आणि आदिल मॅरेज सर्टिफिकेटवर सही करताना दिसत आहेत. या फोटोंसोबतच त्यांच्या मॅरेज सर्टिफिकेटचा फोटोही व्हायरल होत आहे.

राखी सावंतचं झालंय बॉयफ्रेंड आदिल खानशी लग्न? व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण

या मॅरेज सर्टिफिकेटमध्ये लग्नाची तारीख २९ मे २०२२ लिहिलेलं दिसत आहे. त्यामुळे या दोघांनी मागच्या वर्षीच लग्न केल्याचं समोर आलंय. फोटो व्हायरल झाल्यानंतर या निव्वळ अफवा असल्याचं आदिल म्हणाला आहे. तर, राखीने मात्र स्वतःच्या इन्स्टाग्रामवर या फोटोंसह आणखी काही फोटो शेअर करून आदिलबरोबर लग्नाला दुजोरा दिला आहे. “मी खूप आनंदी आहे, मी लग्न केलं आहे, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आदिल,” असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

९ लाख रुपये घेऊन ‘बिग बॉस’ मराठीतून बाहेर पडताच राखी सावंतसाठी वाईट बातमी; स्वतःच माहिती देत म्हणाली…

राखीने एकमेकांना वरमाला घालतानाचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. तिथे काही जण उपस्थित असून राखी व आदिल एकमेकांना वरमाला घालत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राखीने लग्नाचे फोटो शेअर करताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिच्या चाहत्यांसह इंडस्ट्रीतील तिचे मित्र-मैत्रिणी तिला शुभेच्छा देत आहेत.