बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. पती आदिल खानच्या अफेअरबाबत खुलास केल्यानंतर राखीने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मंगळवारी(७ फेब्रुवारी) आदिलला ओशिवारा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला १४ दिवसांची न्यायलयीने कोठडी सुनावण्यात आली होती.

राखीने आदिलवर मारहाण व फसवणुक केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. आदिलने राखीचे व्हिडीओ शूट केल्याचंही तिने म्हटलं आहे. आता ते व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी येत असल्याचं राखीने म्हटलं आहे. राखीचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. ‘विरल भय्यानी’ या पापाराझी पेजवरुन राखीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत राखीने हिजाब घातल्याचं दिसत आहे.

हेही वाचा>> “तशी फिगर नसल्यामुळे…”, अमृता खानविलकरने सांगितला हिंदी सिनेमात काम करण्याचा अनुभव

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माझे व्हिडीओ व्हायरल करण्याची मला धमकी मिळत आहे. मी गप्प नाही बसले तर व्हिडीओ व्हायरल करण्यात येतील, अशी धमकी मला मिळाली आहे. मी खूप घाबरले आहे”, असं राखी म्हणत आहे. पुढे तिने आदिलला जामीन मिळण्याबाबतही भाष्य केलं. राखी म्हणाली, “आदिलचे वकील कोर्टात आल्याचं समजताच मी लगेचच इथे आले. माझे वकिलही कोर्टात पोहोचले. आधी सोमवारी याबाबत निर्णय घेण्यात येणार होता. त्यामुळे आता अचानक काय झालं, म्हणून आम्ही कोर्टात आलो. पण आता सोमवारी किंवा मंगळवारी याबाबत निर्णय देण्यात येईल”.

हेही वाचा>> ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ नावामागील नेमकं रहस्य काय? मालिकेत लवकरच उलगडा होणार

राखीने पतीवर तिचे अश्लील व न्यूड व्हिडीओ शूट केल्याचा आरोप केला आहे. तसंच मानसिक, शारीरिक व भावनिक त्रास दिल्याचा आरोपही राखीने आदिलवर केला आहे. याबरोबरच दीड कोटींचे पैसे घेतल्याचंही राखीने म्हटलं आहे.