राखी सावंत आणि आदिल खान दुर्राणी यांच्यातील वाद आता न्यायालयात जाऊन पोहोचला आहे. राखीने पती आदिल खानच्या विरोधात फसवणूक आणि कौटुंबीक हिंसाचाराचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली आहे. याशिवाय आदिलने १.५ कोटी रुपये घेऊन या व्यवहारात फसवणूक केल्याचा आरोपही राखीने केला आहे. राखीने काही दिवसांपूर्वीच आदिलचे तनु चंडेल नामक तरुणीशी विवाहबाह्य संबंध असल्याचे, तसेच राखीशी लग्न करण्यापूर्वीही तो विवाहित असल्याचा खुलासा केला होता. याचा संबंध काही नेटकऱ्यांनी आदिलची एक्स गर्लफ्रेंड रोशिना देलावरीशी जोडला आहे. जी पेशाने डॉक्टर असून मैसूर येथे राहते.

राखी-आदिलच्या भांडणात आता रोशिनाचं नाव घेतलं जात असल्याचं पाहून तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे. राखी आणि आदिलशी आपला काहीच संबंध नसल्याचं तसेच राखीला आपण केवळ लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी मेसेज केल्याचं रोशिनाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. व्हॉट्सअॅपवरील चॅट्सचे स्क्रीनशॉट शेअर करत रोशिनाने ही पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा- Video: राखी सावंतने आदिल खानच्या गर्लफ्रेंडला दिला शाप; खऱ्या नावाचा उल्लेख करत म्हणाली, “तनू तू माझं…”

रोशिनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करताना लिहिलं, “मी आदिल आणि राखी यांना आनंदी पाहू इच्छिते याचा हा पुरावा आहे. जेव्हा मला समजलं की ते दोघंही विवाहित आहेत मला खूप आनंद झाला. त्यामुळे मी भारतीयांना विनंती करते की या सगळ्यात मला खेचण्याचा प्रयत्न करू नका. कारण मला काही दिवसांपासून या प्रकरणाशी संबंधी मेसेज केले जात आहेत. पण या सगळ्याशी माझा काहीही संबंध नाही.” आपल्या एका इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये रोशिनाने आदिलचे चॅट शेअर केले आहेत ज्यात तिने लिहिलं, “माझा तुमच्या दोघांशी काहीही संबंध नाही. मी देश सोडत आहे. माझं स्वतःचं आयुष्य आहे आणि कृपया तुझ्या पत्नीला सांग की मला आता एकटं सोड.”

roshina delavari instagram post

आणखी वाचा- Video : राखी सावंत आणि शर्लिन चोप्रामधील वाद मिटला? शर्लिनचे आभार मानत म्हणाली “तिने मला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान यापूर्वीही एकदा रोशिना देलावरीचं नाव सोशल मीडियावर चर्चेत आलं होतं. राखी आणि आदिलचं नातं सर्वांसमोर आलेलं त्यावेळी राखीने रोशिनाबद्दल खुलासा केला होता. तेव्हा रोशिनाने स्पष्टीकरण दिलं होतं की, राखी सावंतच तिला सतत फोन करून बॉयफ्रेंड आदिलपासून दूर राहण्यास सांगते. यावेळी राखी आणि रोशिना यांच्यात काही भांडणं झाली होती. मात्र नंतर हे प्रकरण निवळलं होतं.