भारतासाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक ठरला आहे. ‘चांद्रयान ३’चं यशस्वरित्या आज दुपारी २.३५ मिनिटांनी प्रक्षेपण झालं. २३ ऑगस्ट रोजी हे यान चंद्रावर पोहोचण्याची शक्यता आहे. या ‘चांद्रयान-३’च्या प्रक्षेपणावर अभिनेत्री राखी सावंतनं प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यामुळे या ‘चांद्रयान-३’चं प्रक्षेपण झाल्याचा दावा अभिनेत्रीनं केला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

राखी सावंतचा हा व्हिडीओ फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत राखी म्हणते की, “चांद्रग्यानवर चंद्राची चांदणी आली आहे आणि देशावर आमदणी आली आहे. थोडं मागे जा, या चंद्रावर ग्रहण आणून नका नाहीतर अंधार पडेल. तुम्ही सर्वांनी पाहिलं की, ‘चांद्रयान-३’चं प्रक्षेपण झालं आहे, ते फक्त माझ्यामुळे झालं आहे. मी आज ही पांढरी शुभ्र साडी नेसल्यामुळे ‘चांद्रयान-३’चं प्रक्षेपण यशस्वीरित्या झालं आहे.” पुढे व्हिडीओत राखी ‘चांद्रयान-३’चं प्रक्षेपण कसं झालं ते दाखवतं आहे. काही माचिसच्या काड्या पेटवून ती ‘चांद्रयान-३’चं प्रक्षेपण दाखवते.

हेही वाचा – ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचा जलवा कायम! दुसऱ्या आठवड्यात जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला, एकूण कमाई…

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वात मराठमोळ्या व्हिडीओ क्रिएटरची दमदार एंट्री

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकरीन लिहिलं की, “निदान आपल्या भारताच्या अभिमानस्पद असलेल्या क्षणांवर विनोद करू नको.” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं की, “चांगला व्हिडीओ आहे, पण यापुढे नको करू.” तसेच तिसऱ्यानं लिहिलं की, “आपल्या विद्धान शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांची खिल्ली उडवणं बंद कर. त्यांनी खूप मेहनत घेतली आहे.”

हेही वाचा – फोटोग्राफरची रस्त्यावर पडलेली चप्पल उचलली अन्… आलियाच्या ‘त्या’ कृतीनं जिंकली नेटकऱ्यांची मनं, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राखी ही प्रत्येक चर्चित विषयावर बोलत असते. काही दिवसांपूर्वी तिचा टोमॅटोचं झाडं लावतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तसेच याआधी चांगला पती मिळण्यासाठी राखीनं भर पावसात डोक्यावर अंडी फोडून घेतली होती.