Rakul Preet Singh and Jackky Bhagnani Wedding : बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि अभिनेता जॅकी भगनानी यांचा शाही विवाहसोहळा आज ( २१ फेब्रुवारी ) गोव्यात पार पडला. जॅकी-रकुलच्या लग्नाला कुटुंबीयांसह अनेक बॉलीवूड कलाकार आणि त्यांचे जवळचे मित्र-मैत्रिणी उपस्थित राहिले होते. लग्नसोहळा पार पडल्यावर हे दोघेही पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले आहेत.

‘वरिंदर चावला’ने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये जॅकीने पांढऱ्या रंगाची शेरवानी परीधान केल्याचं पाहायला मिळत आहे. तर, रकुल प्रीतने लग्नसोहळ्यात बेबी पिंक रंगाचा सुंदर असा लेहेंगा, त्यावर भरजरी दागिने असा आकर्षक लूक केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच ते माध्यमांसमोर आले, तेव्हाचा हा त्यांचा व्हिडीओ आहे.

हेही वाचा : मेहंदी रंगली गं! क्षितिजाच्या हातावर सजली प्रथमेश परबच्या नावाची मेहंदी, सुंदर डिझाइनने वेधलं लक्ष

दक्षिण गोव्यातील आलिशान हॉटेलमध्ये रकुल-जॅकीच्या लग्नाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यांच्या लग्नात वरुण धवन, राज कुंद्रा, भूमी पेडणेकर, शिल्पा शेट्टी, आयुष्मान खुराना, अर्जुन कपूर, डेव्हिड धवन, आदित्य रॉय कपूर, अनन्या पांडे असे अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी सहभागी झाले होते. या जोडप्यावर आता नेटकऱ्यांसह कलाविश्वातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

हेही वाचा : शुभमंगल सावधान! रकुल प्रीत सिंग व जॅकी भगनानी अडकले लग्नबंधनात; गोव्यात थाटामाटात पार पडला विवाहसोहळा

दरम्यान, गोव्यात लग्नबंधनात अडकल्यावर आता रकुल व जॅकी लवकरच मुंबईत एका भव्य रिसेप्शन पार्टीचं आयोजन करणार आहेत. याशिवाय दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर रकुल प्रीत लवकरच ‘इंडियन २’ चित्रपटात झळकणार आहे. तसेच जॅकी ‘बडे मिया छोटे मिया’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. यामध्ये प्रेक्षकांना अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, सोनाक्षी सिन्हा, पृथ्वीराज सुकुमारन अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.