अभिनेत्री रकुल प्रीत सिंग व अभिनेता जॅकी भगनानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. अनेक दिवसांपासून त्यांच्या नात्याची चर्चा सुरू होती. २१ फेब्रुवारी रोजी दोघे लग्नगाठ बांधणार आहेत. नातेवाईक व जवळच्या मित्र-परिवाराच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडणार आहे. गोव्यातील एका आलिशान हॉटेलमध्ये या दोघांच्या लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

\लग्नासाठी रकुल व जॅकी गोव्यात दाखल झाले आहेत. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघे गोवा विमानतळावर उभे असलेले दिसून येत आहेत. त्यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबातील सदस्यही उपस्थित आहेत. यावेळी रकुलने केशरी रंगाचा ड्रेस घातला होता; तर जॅकीने प्रिंटेड शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली होती.

salman khan off to dubai_cleanup
Video: घरावर गोळीबार झाल्यानंतर सलमान खानने पहिल्यांदाच सोडली मुंबई, विमानतळावरील व्हिडीओ आले समोर
rishikesh River Rafting Raft stuck in rapid during rafting
ऋषिकेशमध्ये रिव्हर राफ्टिंग दरम्यान अपघात; ९ सेकंदाचा श्वास रोखणारा VIDEO होतोय व्हायरल
Viral Video Woman performing stunts funny or adventurous on a luggage conveyor belt at an airport
प्रसिद्धीसाठी कायपण! विमानतळावरील कन्व्हेयर बेल्टवर झोपली तरुणी अन्… Viral Video पाहून नेटकरी हैराण
Alia Bhatt namaskar vahini video viral
Video: गर्दीतून ‘नमस्कार वहिनी’ अशी हाक येताच आलिया भट्टने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत, पाहा व्हिडीओ

हेही वाचा- अमिताभ बच्चन यांच्या अभिनय कारकिर्दीला ५५ वर्षे पूर्ण; AI ने तयार केलेला फोटो शेअर करीत म्हणाले…

रकुल व जॅकी पर्यावरणस्नेही पद्धतीने लग्न करणार आहेत. दोघांनी आपल्या लग्नात नो-क्रॅकर पॉलिसी पर्यायाचा अवलंब केला आहे. लग्न समारंभानंतर हे जोडपे वृक्षारोपणही करणार आहे. रकुल व जॅकीच्या कुटुंबीयांनी कोणत्याही पाहुण्यांना निमंत्रण पत्रिका दिलेली नाही. दोघांनी नातेवाइकांपासून मित्र-परिवारापर्यंत प्रत्येकाला ई-इन्व्हिटेशन पाठविले आहे.

गोव्यातील ‘या’ हॉटेलमध्ये करणार लग्न

मिळालेल्या माहितीनुसार रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांच्या भव्य लग्न गोव्यातील ITC हॉटेलमध्ये होणार आहे. यासाठी हॉटेलमधील जवळपास ३५ खोल्या बुक करण्यात आल्या आहेत; जिथे त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र राहणार आहेत. . हे हॉटेल ४५ एकरमध्ये बांधले गेले असून, त्यात २४६ खोल्या आहेत.

हेही वाचा- रवीना टंडनच्या वडिलांचा मोठा सन्मान, मुंबईतील चौकाला दिलं रवी टंडन यांचं नाव, अभिनेत्री भावुक होत म्हणाली…

लग्नानंतर रकुल-जॅकी हनिमूनला कुठे जाणार

गोव्यात लग्न केल्यानंतर रकुल व जॅकी हनिमूनला कुठे जाणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. बॉम्बे टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, रकुल व जॅकीने लग्नानंतर हनिमूनला जाण्याची योजना रद्द केली असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण- व्यग्र वेळापत्रकामुळे दोघे लग्नानंतर काही दिवसांमध्येच कामावर परतणार आहेत.