दिग्दर्शक ओम राऊत हा सध्या त्याच्या आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या अंतिम ट्रेलरसाठी तिरुपतीमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती, परंतु या दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे सध्या नवा वाद सुरु झाला आहे. तिरुपती बालाजी मंदिर परिसरात देवदर्शन झाल्यावर एकमेकांचा निरोप घेतल्यावर दिग्दर्शक ओम राऊतने क्रिती सेनॉन किस केले. मंदिराच्या परिसरात असे वर्तन केल्याने सध्या दोघांनाही ट्रोल करण्यात येत आहे. यावर आता सीतेची भूमिका साकारलेल्या दीपिका चिखलिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा : Miss World 2023 : ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेचं यजमानपद यंदा भारताकडे; तब्बल २७ वर्षांनी मिळाला बहुमान

ओम राऊत-क्रिती सेनॉनच्या किसिंग वादावर आपले मत व्यक्त करताना दीपिका चिखलिया यांनी ‘आज तक’शी बोलताना सांगितले, “आजकालच्या कलाकारांची ही सर्वात मोठी समस्या आहे की, ते फक्त भूमिका करतात, संबंधित पात्राच्या भावना समजून घेत नाहीत. त्यांच्यासाठी रामायण हा फक्त चित्रपट आहे परंतु, अशा भूमिका अत्यंत मनापासून कराव्या लागतात. क्रिती ही आजच्या काळातील अभिनेत्री असल्याने अलीकडे एखाद्याला किस करणे, मिठी मारणे म्हणजे चांगल्या स्वभावाचे लक्षण समजले जाते, पण लोक आता सीतेच्या भूमिकेनुसार तिच्याकडे पाहत आहेत.”

हेही वाचा : “नट्टू काका सेटवर अनेकदा रडले” जेनिफर मिस्त्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली “एक सुट्टी मागितल्यावर…”

दीपिका चिखलिया पुढे म्हणाल्या, “मी सीता मातेचे पात्र पूर्णपणे जगले आहे. आजकालच्या अभिनेत्री फक्त एक भूमिका म्हणून साकारतात. एखादा चित्रपट किंवा प्रोजेक्ट संपला की, त्यांना पुढची काळजी नसते. आमच्या सेटवर कोणीही मला नावाने हाक मारत नव्हते, सेटवर येऊन अनेक लोक कलाकारांच्या पाया पडत होते… तो काळ वेगळा होता. राम-सीतेचे पात्र साकारणाऱ्या कलाकारांना लोक देव मानायचे म्हणून मी कोणाला मिठीही मारायचे नाही, किस वगैरे फार दूरची गोष्ट आहे.”

हेही वाचा : “अभिनयाचा ‘अ’ पण येत नाही” प्रसिद्ध अभिनेत्रीची सोनाक्षी सिन्हावर अप्रत्यक्ष टीका, म्हणाली “एकही एपिसोड नीट…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आदिपुरुषच्या रिलीजनंतर यामधील सर्व कलाकार त्यांच्या इतर प्रकल्पांमध्ये व्यस्त होतील आणि कदाचित ते पात्र विसरतील, परंतु आमच्या बाबतीत असे कधीच घडले नाही. यामुळेच आम्ही लोकांच्या भावना दुखावणार नाहीत याची नेहमी काळजी घेतली,” असे दीपिका चिखलिया यांनी सांगितले.