आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे त्यांना कन्यारत्न झाल्यानंतर चांगलेच चर्चेत आहेत. त्यानंतर त्यांनी एकत्र साजरे केलेल्या सणांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नुकतंच आलिया आणि रणबीरचे घरच्यांसह ख्रिसमसच्या सेलिब्रेशनचे फोटोसुद्धा चांगलेच व्हायरल झाले होते. याबरोबरच रणबीर आणि अलिया लवकरच त्यांच्या नवीन घरात शिफ्ट होणार असल्याच्याही चर्चा सुरू होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतंच हे जोडपं कृष्ण राज या मुंबईतील त्यांच्या नवीन घरी गेले होते. यादरम्यानचे त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रणबीर आणि आलिया हे दोघे त्यांच्या टीमसह त्यांच्या घराची पाहणी करण्यासाठी गेल्याचं स्पष्ट होत आहे. शिवाय घरात नेमके काय काय बदल करायचे आहेत याबद्दल आलिया इतरांशी बोलताना सल्ला देताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.

आणखी वाचा : “बॉडी बनवायला किती वेळ लागला?” चाहत्याच्या प्रश्नाला शाहरुखने त्याच्या खास शैलीत दिलं उत्तर

रणबीरसुद्धा त्यांच्या अंडर कन्स्ट्रकशन असलेल्या घराचे काही फोटोज काढत होता. दोघेही त्यांचं घर आणखी सुरेख कसं करता येईल यासाठी वेगवेगळ्या आयडियाज त्यांच्या टीमबरोबर शेअर करताना दिसले. नुकतंच रणबीर आणि आलियाने त्यांची मुलगी राहाला जन्म दिला. लवकरच या तिघांचं हे सुखी कुटुंब बांद्रा येथील या नवीन घरात राहायला येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रणबीर आणि आलियाचं हे घर तब्बल ८ मजल्यांचं असणार आहे. या घरात स्विमिंग पूल, ऑफिस आणि प्रशस्त पार्किंगची सोय असणार आहे. खालचा मजला हा आजी नितू कपूर यांच्यासाठी असून, यापैकी एक संपूर्ण मजला रणबीरची बहीण रिद्धिमा आणि तिच्या पतीसाठी राखून ठेवण्यात आला आहे. आलिया-रणबीर हे दोघेही नुकतंच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात झळकले. लग्न आणि मुलीच्या जन्मानंतर आलियाने काही दिवस ब्रेक घ्यायचं ठरवलं आहे तर रणबीर त्याच्या आगामी ‘अॅनिमल’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoor alia bhatt visits their dream home which is under construction video viral avn
First published on: 26-12-2022 at 17:42 IST