रणबीर कपूरने संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या टीझरमध्ये रुद्रावतार धारण करत सोशल मीडियावर तुफान लोकप्रियता मिळवली आहे. बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती डिमरी यांच्या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे आणि आता या चित्रपटासाठी रणबीर कपूरने नेमकं मकिती मानधन घेतलं आहे याची चर्चा होऊ लागली आहे. ‘तू झूठी मै मक्कार’साठी रणबीरने २५ कोटी मानधन घेतलं होतं.

आता ‘अ‍ॅनिमल’साठी रणबीर याहून अधिक मानधन घेणार असल्याची चर्चा आहे. रणबीरचा हा डॅशिंग लुक निर्माते अन् दिग्दर्शक यांना चांगलाच भारी पडल्याची चर्चा आहे. या चित्रपटासाठी रणबीरने बॉबी देओलपेक्षा १४ पट जास्त रक्कम आकारल्याचं सांगितलं जात आहे. तर यात अनिल कपूर यांना सर्वात कमी मानधन मिळाल्याचीही चर्चा आहे.

आणखी वाचा : “पाकिस्तानी कलाकारांनाही…” शाहरुख खानच्या चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल ढोलकीया यांचं ट्वीट चर्चेत

मीडिया रीपोर्टनुसार रणबीरने या चित्रपटासाठी तब्बल ७० कोटी मानधन घेतल्याचं समोर आलं आहे. तर अनिल कपूर यांना सहाय्यक भूमिकेत घेतल्याने त्यांना फक्त २ कोटीच देण्यात आले असल्याचं सांगितलं जात आहे. बॉबी देओलला या चित्रपटासाठी ३ ते ४ कोटी मिळाले असल्याचं सांगितलं जात आहे तर रश्मिका मंदानालाही तिच्या भूमिकेच्या मानाने कमी मानधन मिळालं असल्याचं स्पष्ट झालं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अद्याप या आकड्यांची पुष्टी झालेली नसली तरी या सगळ्यात रणबीरला सर्वाधिक मानधन दिलं गेलं असल्याने ही चर्चा रंगू लागली आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. याच्या टीझरलाही प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. १ डिसेंबर रोजी ‘अ‍ॅनिमल’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.