अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट नुकतेच आई-वडील झाले. आता त्यांची लेक एका महिन्याची झाली आहे. नुकतंच त्यांनी त्यांच्या लेकीचं बारसं केलं आणि तिचं नाव ‘राहा’ ठेवल्याचं सांगितलं. लेकीच्या जन्माच्या काही दिवसांनीच रणबीर कपूर त्याच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र झाला आहे. दरम्यान त्याने भविष्याची काळजी व्यक्त करत त्याच्या मुलांचा उल्लेख करत एक असुरक्षितता व्यक्त केली.

अलीकडेच त्याने ‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये हजेरी लावली. यावेळी तो त्याच्या आगामी चित्रपटांबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही भरभरून बोलला. त्याने त्याच्या लेकीबद्दल सर्वांना सांगितलं. वडील झाल्यावर त्याला कसं वाटतंय हेही त्याने शेअर केलं. पण त्याने एका बाबतीत असुरक्षितता व्यक्त करून दाखवली.

हेही वाचा : Video: मुलीच्या जन्मानंतर आलिया पहिल्यांदाच दिसली सार्वजनिक ठिकाणी, तिची अवस्था पाहून सर्वांनाच बसला धक्का

तो म्हणाला, “माझी मुलं जेव्हा २० वर्षांची होतील तेव्हा मी ६० वर्षांचा असेन. तेव्हा मी त्यांच्याबरोबर फुटबॉल खेळू शकेन का? त्यांच्याबरोबर धावू शकेन का? ही काळजी मला सतावते.”

आणखी वाचा : ‘विकी डोनर २’बद्दल आयुष्मान खुरानाचा मोठा खुलासा, म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रणबीर कपूर आता ४० वर्षांचा आहे. याच वर्षी एप्रिलमध्ये त्याने आलिया भट्टशी लग्नगाठ बांधली. काही महिने एकमेकांना डेट केल्यावर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अगदी जवळच्या नतेवाईक आणि मित्र मंडळींच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केलं. तर ६ नोव्हेंबर रोजी आलियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला.