अभिनेता रणबीर कपूरला बॉलीवूडचा चॉकलेट बॉय म्हटले जाते. आपल्या अभिनयाच्या जोरावर रणबीरने बॉलीवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. रणबीरचा ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटात रणबीरबरोबर ऐश्वर्या राय आणि अनुष्का शर्माही मुख्य भूमिकेत होत्या. या तिघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली होती. मात्र, या चित्रपटात ऐश्वर्या रायबरोबर रोमँटिक सीन चित्रित करताना रणबीर खूपच घाबरला होता. खुद्द रणबीरने याबाबतचा खुलासा केला आहे.

हेही वाचा- खऱ्या आयुष्यात हिंसा बघितल्यावर अनुराग कश्यपची काय होते अवस्था? खुलासा करत दिग्दर्शक म्हणाला, “मला रक्त दिसले तर…”

Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!

रणबीर कपूरने अलीकडेच एका रेडिओ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता की, ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये ऐश्वर्या रायसोबत रोमँटिक सीन करताना तो खूप लाजत होता. तो ऐश्वर्याच्या गालाला स्पर्श करू शकला नाही. ऐश्वर्याच्या गालाला स्पर्श करतानाही रणबीरचे हात थरथरत होते. त्यानंतर ऐश्वर्या रायने रणबीरला समजावून सांगितले की, आपल्याला एकच सीन शूट करायचा आहे. आपल्याला फक्त अभिनय करायचा आहे आणि तोही चांगला. रणबीर पुढे म्हणाला, मला त्या वेळी वाटले होते की मला ही संधी पुन्हा मिळणार नाही, म्हणून मी ही संधी साधली आणि चांगले काम केले.”

हेही वाचा- Video : खासदार राघव चड्ढांचा मॉडेलिंग क्षेत्रात प्रवेश?; रॅम्पवॉकचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “लडकी का चक्कर…”

या मुलाखतीनंतर रणबीर कपूरला खूप ट्रोल करण्यात आले. रणबीरने स्पष्टीकरण देताना सांगितले की, “ऐश्वर्या खूप चांगली अभिनेत्री आहे आणि आमची खूप चांगली फॅमिली फ्रेण्डही आहे. ती भारतातील सर्वात प्रतिभावान आणि आदरणीय महिला आहे. ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटातील तिच्या योगदानाबद्दल मी तिचे नेहमीच आभार मानतो. मी तिचा कोणत्याही प्रकारे अपमान केलेला नाही.”