Ranbir Kapoor : आलिया आणि रणबीरपेक्षा सध्या त्यांची लाडकी लेक राहाची सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा असते. नुकताच राहाने तिचा दुसरा वाढदिवस साजरा केला. यावेळी संपूर्ण मनोरंजन विश्वातून रणबीरच्या लाडक्या लेकीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला होता. राहाचा वाढदिवस मुकेश अंबानींच्या जिओ वर्ल्ड सेंटरला साजरा करण्यात आला होता. कपूर आणि अंबानी कुटुंबीयांमध्ये फार पूर्वीपासून चांगली मैत्री आहे. याची प्रचिती नुकत्याच होणाऱ्या एका व्हायरल व्हिडीओमुळे पुन्हा एकदा आली आहे.

आलिया व रणबीर नेहमीच आपल्या शूटिंगचं व्यग्र वेळापत्रक सांभाळून आपल्या लाडक्या लेकीला वेळ देताना दिसतात. विशेषत: वीकेंडला आलिया-रणबीर राहाबरोबर फेरफटका मारायला जातात. हे तिघंही आज वांद्र्यात एका नामांकित रेस्टॉरंटमध्ये दुपारच्या जेवणासाठी गेले होते. यावेळी रणबीर-आलियाने Twinning केल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा : Video : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये रडल्याने तरुणी झाली ट्रोल, गायक बाजू घेत म्हणाला, “तुम्ही देशाच्या…”

रणबीरच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

आलिया, रणबीर ( Ranbir Kapoor ) आणि राहाचा एकत्र बाहेर फिरायला गेल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पण, रेस्टॉरंटमधून बाहेर पडल्यावर रणबीरच्या एका कृतीने सर्वांचं लक्ष वेधून वेधून घेतलं आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये रणबीरच्या अगदी पुढे अंबानींचे जावई आनंद पिरामल चालताना दिसत आहेत. यावेळी रणबीरने राहाला तर, आनंद पिरामल यांनी त्यांची लेक आदियाला कडेवर घेतलं होतं. मागून येणाऱ्या रणबीरने चेहऱ्यावर गोड हावभाव करून आदियाची विचारपूस केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

रणबीर ( Ranbir Kapoor ) अगदी हसुन-खेळून आदियाशी संवाद साधताना दिसत आहे. नंतर रणबीर आलियाला सुद्धा आदियाकडे बघ असं हातवारे करून खुनावत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. तर, बाबाच्या कडेवर असलेली राहा सुद्धा आदियाकडे मोठ्या उत्सुकतेने पाहत होती. हा गोड व्हिडीओ सध्या सोशल चांगलाच चर्चेच आला आहे.

हेही वाचा : “एक पक्ष १५०० देतोय, दुसरा ३ हजार देणार, पण…”, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गिरीश ओक यांनी विचारले दोन ‘भाबडे’ प्रश्न; पोस्ट चर्चेत

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “राहा खूपच गोड दिसतेय”, “गोड कुटुंब”, “आलियाने रणबीरला पूर्णपणे बदललं आहे”, “लाडक्या लेकीबरोबर रणबीर”, “रणबीर- आलिया आणि राहा… परफेक्ट फॅमिली” अशा असंख्य प्रतिक्रिया या व्हिडीओवर ( Ranbir Kapoor ) आल्या आहेत.