अभिनेता रणबीर कपूर बाबा झाल्यानंतर पहिल्यांदाच ‘तू झुठी मैं मक्कार’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये रणबीर व्यग्र आहे. प्रमोशन कार्यक्रमांमध्ये रणबीरला सर्वात जास्त त्याची मुलगी राहाबद्दल प्रश्न विचारले जातात, तोही आनंदाने सर्व प्रश्नांची उत्तरं देत असतो. मुलगी राहाला पहिलं गिफ्ट काय दिलं होतं, याबद्दल रणबीरने खुलासा केला आहे.
“लेक राहाने आई आलियासारखं होऊ नये, कारण…” रणबीर कपूरचं वक्तव्य
रणबीरने आपल्या मुलीसाठी खरेदी केलेली पहिली गोष्ट कोणती असे विचारले असता तो ‘इ-टाइम्स’ला म्हणाला, “एक स्निकरची जोड, अगदी लहानचे नायकेचे स्निकर आणि तिचे नाव व ८ नंबर लिहिलेली बार्सिलोना जर्सी, मी तिच्यासाठी घेतली होती.” गेल्या वर्षी, त्यांनी मुलीचे नाव घोषित केल्यावर आलिया भट्टने राहाच्या मिनी बार्सिलोना जर्सीची एक झलक तिच्या नावासह इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. ती जर्सी फ्रेम करून त्यांनी घराच्या भिंतीवर लावली आहे.
दरम्यान, आलिया भट्ट व रणबीर कपूरने १४ एप्रिल २०२२ रोजी लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर जूनमध्ये त्यांनी पालक होणार असल्याची माहिती दिली होती. ६ नोव्हेंबर २०२२ रोजी आलिया व रणबीर लेक राहाचे पालक झाले होते. लेकीच्या जन्मानंतर काही महिने कामातून ब्रेक घेतल्यानंतर आलिया आता तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. तर रणबीरचा ‘तू झुठी मै मक्कार’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असं म्हटलं जातंय.