‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’ कालपासून (३० मार्चपासून) नेटफ्लिक्सवर सुरू झाला. पहिल्याच शोला रणबीर कपूर, नीतू कपूर व रिद्धिमा कपूर साहनी यांनी हजेरी लावली. शोदरम्यान तिघांनी कपूर कुटुंबाबतचे अनेक किस्से सांगितले. रणबीरने वडील व दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची आठवण काढली आणि त्यांच्याबद्दलचा एक खास किस्सा सांगितला; ज्यात रणबीरनं ऋषी कपूर यांचा खूप मार खाल्ला होता.

शोदरम्यान रणबीरनं सांगितलं की, आजपर्यंत ऋषी कपूर यांनी त्याच्यावर एकदाच हात उचलला आहे. रणबीर म्हणाला, “बाबा खूप धार्मिक होते. आर. के. स्टुडिओजमध्ये तेव्हा दिवाळीची पूजा होती. तेव्हा कदाचित मी आठ-नऊ वर्षांचा होतो आणि मी चप्पल घालून मंदिरात गेलो होतो. तेव्हा मी वडिलांचा खूप मार खाल्ला होता.”

तर, नीतू कपूर यांनी दोन्ही मुलं रणबीर आणि रिद्धिमाचं कौतुक केलं. नीतू कपूर म्हणाल्या, “माझी दोन्ही मुलं खूप चांगली आहेत. दोघांनी कधीच कोणाशी मोठ्या आवाजात संभाषण केलं नाही. माझ्या मुलांवर खूप चांगले संस्कार झाले आहेत; जे ऋषीजी यांनी त्यांना दिले दिले आहेत. त्यांनी दोघांना वेळेचं महत्त्व शिकवलं. माणसांची आणि पैशाची किंमत करायला शिकवली.”

हेही वाचा… आलिया भट्टने ‘क्रू’ चित्रपटातील अभिनेत्रींचे केले कौतुक; म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रणबीरच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘लव्ह अ‍ॅण्ड वॉर’ या आगामी चित्रपटात रणबीर झळकणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच २०२५ ला ख्रिसमसदरम्यान प्रदर्शित होणार आहे. तसेच आलिया आणि रणबीर पुन्हा एकदा एकत्र ‘ब्रह्मास्त्र-२’मध्ये झळकणार आहेत.