यंदा ख्रिसमसच्या निमित्ताने बॉलीवूडचे कपूर घराणे चांगलेच चर्चेत आहे. सर्वप्रथम रणबीर कपूर-आलिया भट्ट यांनी त्यांची मुलगी राहाचा चेहरा मीडियासमोर दाखवला. या स्टार किडच्या गोंडस चहऱ्याने आणि निरागसतेने लोकांची मने जिंकली. यानंतर, कपूर कुटुंबीयांनी ख्रिसमसच्या सेलिब्रेशनचा एक फोटो शेअर केला, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला झाला. आता रणबीर कपूरशी संबंधित याच सेलिब्रेशन पार्टीतील एक व्हिडिओ समोर आला आहे.

या व्हिडीओमध्ये रणबीरच्या तोंडून असं काही निघालं आहे की ज्यावर चांगलाच हशा पिकला असून लोकांनी त्याला ट्रोलही कारायला सुरुवात केली आहे. संपूर्ण कपूर कुटुंबीयांनी एकत्र येऊन ख्रिसमस साजरा केला. रणबीरचा चुलत भाऊ आधार जैन याने या सेलिब्रेशनचा एक फोटो शेअर केला होता. आता रणबीर कपूरच्या फॅमिली लंचचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. त्याच्या अनेक चाहत्यांना हा व्हिडिओ खूपच मजेदार वाटला आहे अन् त्यांनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

आणखी वाचा : “मला ‘द आर्चीज’ पाहायची अजिबात इच्छा नव्हती पण…” मनोज बाजपेयी यांनी केला मोठा खुलासा

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक जळणारा चॉकलेट केक दिसत आहे. केकवर दारू ओतून हलका स्वाद येण्यासाठी हा प्रकार बऱ्याचदा केलं जातो. या केकवर लायटर रणबीर कपूरने आग लावली आहे. केक कापताना कपूर कुटुंब एकमेकांसोबत मस्ती करताना दिसत आहे. दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचा मुलगा कुणाल कपूर हातात सूरी घेऊन केक कापण्याच्या तयारीत दिसत आहे. केक कटींगला सुरुवात होताच रणबीरच्या तोंडून ‘जय माता दी’ अशी घोषणा ऐकू येत आहे. हे ऐकून सगळ्यांनाच हसू आलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रणबीरच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर मजेशीर कॉमेंट केल्या आहेत. तर काहींनी त्याल ट्रोलही केलं आहे. कपूर कुटुंबीय हे ख्रिसमस एवढ्या धूमधडाक्यात साजरं का करतात असा सवालही बऱ्याच लोकांनी केला आहे. त्यावर एका यूझरने कॉमेंट करत कारण सांगितलं आहे. कपूर परिवारात ख्रिसमस साजरा करायची परंपरा शशी कपूर यांनी जेनीफरशी लग्न केल्यानंतर सुरू झाली, अन् त्यांच्या पश्चातआजही कपूर कुटुंब एकत्र येऊन ख्रिसमस साजरा करतं.