scorecardresearch

Premium

Video : मणिपूरमध्ये लग्न केल्यानंतर रणदीप-लिन मुंबईत दाखल; नवदाम्पत्याच्या लूकने वेधले लक्ष

२९ नोव्हेंबरला रणदीप हुड्डा आणि लिन लैशरामने मणिपूरमध्ये लग्नगाठ बांधली

randeep-hooda and-lin-laishram
मणिपूरमध्ये लग्न केल्यानंतर रणदीप-लिन मुंबईत दाखल

बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा सध्या खूप चर्चेत आहे. नुकतीच रणदीपने त्याची गर्लफ्रेंड लिन लैशरामबरोबर लग्नगाठ बांधली. मणिपूरमध्ये पारंपरिक पद्धतीनुसार रणदीप व लिनचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता लग्नानंतर रणदीप पत्नीसह मुंबईत दाखल झाला आहे. या नवदाम्पत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा- ‘या’ कारणाने विकी कौशलवर चिडलेली कतरिना कैफ; म्हणाला, “तिने अक्षरशः माझा हात ओढला अन्…”

Nashik Citylink bus
परीक्षा काळातच नाशिकची सिटीलिंक बससेवा पुन्हा ठप्प
It is revealed that a sex racket is going on in Oyo hotels in Nagpur
नागपुरातील ‘ओयो’त ‘सेक्स रॅकेट’, अल्पवयीन मुली…
Delhi Salon firing shot dead २
दिल्लीतल्या सलूनमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, दोघांची हत्या, CCTV VIDEO व्हायरल
Mark Boucher on Rohit Sharma Captaincy
Rohit Sharma : ‘…म्हणून रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवले’, मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकाचा मोठा खुलासा

लग्नानंतर रणदीप हुडा आणि लिन लैशराम मुंबईत परतले आहेत. नुकतेच दोघे मुंबई विमानतळावर दिसून आले. दरम्यान, रणदीप आणि लिनच्या लूकची जोरदार चर्चा रंगली होती. यावेळी रणदीपने पांढऱ्या रंगाची शर्ट-पॅन्ट परिधान केली होती; तर लिनने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. त्याचबरोबर तिने कपड्यांना साजेशी अशी लाल रंगाची पर्सही घेतली होती. रणदीप आणि लिन एकमेकांचा हात धरून मीडियासमोर पोझ देताना दिसले.

कुटुंबीय, जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत रणदीप आणि लिनच्या लग्नसोहळा पार पडला. रणदीप व लिनच्या लग्नानंतर आता मुंबईत एका भव्य स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये बॉलीवूडमधील अनेक कलाकारांना आमंत्रण देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा- Video: मुंबई विमानतळावर सुरक्षा रक्षकाने शाहरुख खानला अडवलं अन् मग…; बादशाहच्या ‘त्या’ कृतीने सगळ्यांचं वेधलं लक्ष

रणदीप हुडाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर रणदीप लवकरच त्याच्या आगामी ‘सार्जंट’ चित्रपटात दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Randeep hooda and lin laishram first appearance in mumbai after marriage video viral dpj

First published on: 01-12-2023 at 11:56 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×