scorecardresearch

Premium

‘या’ कारणाने विकी कौशलवर चिडलेली कतरिना कैफ; म्हणाला, “तिने अक्षरशः माझा हात ओढला अन्…”

“मी कतरिनाला विचारलं की यात काय वाईट आहे आणि मग ती..”, विकी कौशलने केला खुलासा

vicky kaushal katrina kaif
विकी कौशल नेमकं काय म्हणाला? जाणून घ्या (फोटो – इन्स्टाग्राम)

बॉलीवूड अभिनेता विकी कौशलचा ‘सॅम बहादुर’ हा चित्रपट आज (१ डिसेंबर) देशभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामुळे अभिनेता सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे. विकी कौशल या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. याच दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विकी कौशलने पत्नी कतरिनाशी संबंधित काही गुपितं उघड केली आहेत.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विकी कौशलला कतरिनाकडून काय शिकायला मिळालं, असा प्रश्न विचारण्यात आला. विकी म्हणाला, “कतरिना माझ्या फॅशनबद्दल माझ्या तोंडावर वाईट बोलते. मी काय घालायला पाहिजे हे कतरिनाच ठरवते आणि तसं झालं नाही तर ती तोंडावर म्हणते की काय जोकर दिसत आहेस. एकदा मी कुठेतरी जात होतो. तिने अक्षरशः माझा हात ओढला आणि ‘तू असा बाहेर जाणार नाहीस’ असं म्हणत मला मागे खेचलं. मी कतरिनाला विचारलं की यात काय वाईट आहे आणि मग ती म्हणाली की सगळंच वाईट आहे. त्यानंतर मी पुन्हा कपडे बदलले.”

Sameer Wankhede on aryan Khan arrest
आर्यन खानच्या अटकेनंतर जातीवरून केलं लक्ष्य, भ्रष्टाचाराचे झालेले आरोप; समीर वानखेडे म्हणाले, “प्रत्येक गोष्टीचा संबंध…”
Chanakya Niti
Chanakya Niti :आर्थिक अडचणी दूर करतील आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या या तीन गोष्टी, नेहमी राहील लक्ष्मीची कृपा
your mental health is bad then talk to yourself you will feel better
नकारात्मक विचार कसे टाळावे? मानसिक स्वास्थ्य खराब असेल तर स्वतःशी बोला, तुम्हाला बरे वाटेल!
sanket pai way of life writer of your life self live life
जिंकावे नि जगावेही : तूच आहेस तुझ्या जीवनाचा कथाकार!

“मी चित्रपट दोनदा पाहिला आणि…”, ‘सॅम बहादुर’बद्दल सॅम माणेकशा यांच्या मुलीची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “जेव्हा विकी…”

विकी कौशलने कतरिनाचं कौतुक केलं. “जेव्हा जेव्हा कोणताही अॅक्शन सीन किंवा गाणं किंवा शूटिंग असतं तेव्हा ती खूप तयारी करते. ती खूप मेहनत करते. कोणत्याही शूटच्या ५ महिने आधीच तिची तयारी सुरू होते. ती तिचा डाएट बदलते आणि दिनचर्याही बदलते. एवढी शिस्त मी आजवर पाहिली नाही. मी शिस्तबद्ध राहणं तिच्याकडून शिकलो,” असं विकी कतरिनाबद्दल म्हणाला.

विकी कौशलच्या ‘सॅम बहादुर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजारने केले आहे. हा चित्रपट सॅम माणेकशा यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाची आज बॉक्स ऑफिसवर रणबीर कपूर स्टारर ‘अॅनिमल’ या चित्रपटाशी टक्कर होत आहे. विक्की कौशलशिवाय सान्या मल्होत्रा ​​आणि फातिमा सना शेख या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vicky kaushal reveals wife katrina kaif does not like his fashion sense sam bahadur hrc

First published on: 01-12-2023 at 11:14 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×